Satara: कोयनेच्या जलाशयात आत्महत्येचा प्रयत्न; दोन आंदोलकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:00 IST2025-06-17T19:00:32+5:302025-06-17T19:00:52+5:30

सातारा : दिव्यांगांच्या मागण्यांसाठी पाण्यात उतरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन आंदोलकांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

A case has been registered at Medha police station against two protesters who attempted suicide by jumping into water to demand the rights of the disabled | Satara: कोयनेच्या जलाशयात आत्महत्येचा प्रयत्न; दोन आंदोलकांवर गुन्हा

Satara: कोयनेच्या जलाशयात आत्महत्येचा प्रयत्न; दोन आंदोलकांवर गुन्हा

सातारा : दिव्यांगांच्या मागण्यांसाठी पाण्यात उतरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन आंदोलकांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आंदोलन रविवारी (दि.१५) बामणोली, ता. जावळी येथील कोयना धरणाच्या जलाशयामध्ये करण्यात आले होते.

अजय हणमंत पवार (वय ४०, रा. समर्थ मंदिर परिसर, सातारा), नामदेव महादेव इंगले (वय ४४, रा. यलमारवाडी, ता. खटाव), अशी गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांची नावे आहेत. याबाबत सहायक फाैजदार शंकर शिनगारे यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या आंदोलकांनी आंदोलनाची पोलिस स्टेशनला पूर्वसूचना देऊन पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असताना त्यांनी पूर्वसूचना, पूर्वपरवानगी न घेता हे आंदोलन केले, तसेच स्वत:च्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने भीती दाखविण्याची तयारी करून पाण्यात उतरले. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. 

त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला. यामुळे संशयितांनी आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचेही फाैजदार शिनगारे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सहायक फाैजदार भिसे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A case has been registered at Medha police station against two protesters who attempted suicide by jumping into water to demand the rights of the disabled