जिल्ह्यात ८७८७ जणांनी दिली राज्यसेवा पूर्वपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:38+5:302021-03-22T04:35:38+5:30

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी सातारा जिल्ह्यातील ३६ केंद्रांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेण्यात आली. नोंदणी केलेल्या १४ हजार ८२६ ...

8787 people in the district gave state service pre-examination | जिल्ह्यात ८७८७ जणांनी दिली राज्यसेवा पूर्वपरीक्षा

जिल्ह्यात ८७८७ जणांनी दिली राज्यसेवा पूर्वपरीक्षा

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी सातारा जिल्ह्यातील ३६ केंद्रांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेण्यात आली. नोंदणी केलेल्या १४ हजार ८२६ पैकी ८ हजार ७८७ परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. तर कोरोनामुळे सर्व काळजी घेऊन ही परीक्षा सुरळीत पार पडली.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा १४ मार्चला होणार होती; परंतू राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासनाकडून खबरदारी म्हणून परीक्षा २१ मार्चला आयोजित करण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन परीक्षा घेण्यात आली.

सातारा जिल्ह्यातून १४ हजार ८२६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती, तर ८ हजार ७८७ जणांनी परीक्षा दिली. म्हणजे ५९ टक्के परीक्षार्थी उपस्थित होते.

परीक्षेसाठी जिल्ह्यात ३६ केंद्रे होती. त्यासाठी प्रशासनाकडून ३६ केंद्रांवर ३६ केंद्रप्रमुख कार्यरत होते. तर १९८ पर्यवेक्षक, ७१२ समवेक्षक, ९६ मदतनीस लिपिक, २७० शिपाई आणि ३६ वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली होती.

जिल्ह्यातील शेंद्रे, ता. सातारा येथील अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, लालबहादूर शास्त्री कॉलेज, अनंत इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, महाराजा सयाजीराव विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, पोदार इंटरनॅशनल स्कूल, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शाहू अ‍कॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज, तर वाढेफाटा परिसरातील यशोदा टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, पानमळेवाडी येथील अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक तर भारत विद्यामंदिर संभाजीनगर (कोडोली) येथे परीक्षा झाली.

त्याचरोबर साताऱ्यातील भवानी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज, कला व वाणिज्य महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, श्रीपतराव पाटील हायस्कूल, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर, छत्रपती शिवाजी कॉलेज येथेही परीक्षा झाली. तर कोरेगावमध्ये दि मॉडर्न इंग्लिश स्कूल, डी. पी. भोसले कॉलेज, कऱ्हाड येथे शासकीय तंत्रनिकेतन विद्यानगर, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, टिळक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, यशवंत हायस्कूल, विठामाता विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, श्री शिवाजी विद्यालय येथे तसेच वाईमध्ये कन्या शाळा, द्रविड हायस्कूल, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयात परीक्षा पार पडली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती.

फोटो जावेद...

..................................................................

Web Title: 8787 people in the district gave state service pre-examination