शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एक हजारात ६२३ रुग्ण मधुमेहाचे!

By admin | Updated: November 11, 2014 00:04 IST

रुग्णांना मोफत औषधोपचार करणार असल्याची माहिती नियंत्रण प्रकल्प जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक पोळ

पाटण : पाटण तालुक्यातही राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनिवारण कार्यक्रम हाती घेतला आहे. मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब व स्ट्रॉक अशा असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी रुग्णांना नाहक खर्च सहन करावा लागतो. त्याचा विचार करून शासन ग्रामीण रुग्णालय स्तरावर त्याची अंमलबजावणीची मोहीम यशस्वीपणे राबविणार आहे. रुग्णांना मोफत औषधोपचार करणार असल्याची माहिती नियंत्रण प्रकल्प जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिली. दरम्यान, त्यांनी एक हजारांमागे ६२३ रुग्ण मधुमेहाचे असतात, असे सांगितले. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अधीक्षक डॉ. प्रताप वाघमारे, डॉ. चंद्रकांत यादव, डॉ. वीरेंद्र घड्याळे उपस्थित होते. दि. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय मधुमेह व कॅन्सर जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गावपातळीवर स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी व सेवक यांच्या माध्यमातून शिबिरे राबविण्यात येणार आहेत, असे डॉ. पोळ यांनी सांगितले. या मोहिमेसाठी पाटण ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. घड्याळे यांची राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण प्रकल्प तालुका अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. सामान्य माणसाला उपचारासाठी लागणारा खर्च व त्यावरील उपचार न परवडणरा आहे. यासाठी या मोहिमेद्वारे शासन मोफत औषधोपचार करणार आहे. रुग्णालयासाठीचे लागणारी औषधे प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. या मोहिमेचा अतिदुर्गम ग्रामीण भागातील रुग्णांना उपयोग व्हावा, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी असे आयोजन करण्यात येणार आहे. आहारातील अनियमितपणा, बदलती जीवनशैली यामुळे असंसर्गजन्य रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) तपासणीनंतर औषधप्रत्येकी एक हजार रुग्णांमागे मधुमेहाचा ६२३, उच्च रक्तदाबाचे १६९ तर हृदरोगाचे ३७ रुग्ण आढळून येतात. दरम्यान पाटण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासण्या करून निदान झाल्यानंतर आजाराचे गांभीर्य ओळखून त्यास योग्य तो औषधोपचार करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.