शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याला अतिवृष्टीचा फटका; पाचजणांचा मृत्यू, ४७४ गावांना बाधा, ५४९ घरांची पडझड

By नितीन काळेल | Updated: August 21, 2024 18:49 IST

शेतकऱ्यांचे नुकसान 

सातारा : जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीतील नुकसानीची माहिती समोर आली असून एकूण ४७४ गावे बाधित झाली. यामध्ये ५४९ घरांची पडझड झाली. त्याचबरोबर विविध कारणांनी पाचजणांचा मृत्यू झाला असून २९ जनावरेही दगावलीत. शेतीक्षेत्रालाही काही प्रमाणात फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होते. विशेषत: करुन पश्चिम भागातील सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर आणि वाई तालुक्याला याचा फटका बसतो. यंदा मात्र, जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यावर अतिवृष्टी झाली. सलग १२ दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. यामुळे नुकसानीच्या घटना वाढल्या. याचा फटका शेती, घरे आणि जनावरांना बसला. जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार नुकसानीचे प्रमाण चांगलेच दिसून आलेले आहे.

जून महिन्यात अतिवृष्टी होऊन २५ गावे बाधित झाली होती. यामध्ये ४१ घरांची पडझड झाली. पाटण तालुक्यातच पावसामुळे अधिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. इतर तालुक्यात किरकोळ स्वरुपात हानी झाली. तसेच जूनमधीलच अतिवृष्टीत २ गोठ्यांचेही नुकसान झाले होते. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील अतिवृष्टीत नुकसानीचा आकडा मोठा राहिला. पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर आदी तालुक्यातील ४४९ गावे बाधित झाली होती. यामध्ये ५०८ घरांना फटका बसला. काही घरे भुईसपाट झाली. तर काही घरांचे अंशत: नुकसान झाले. तरीही या अतिवृष्टीने अनेकांना दुसरीकडे निवारा शोधावा लागला होता. तसेच अतिवृष्टीत एक गोठ्याचेही नुकसान झाले होते.अतिवृष्टीच्या काळात पूर येणे व अन्य कारणाने पाच व्यक्तींना प्राणाला मुकावे लागले. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतच या घटना घडल्या होत्या. तर एक व्यक्ती बेपत्ता आहे. तर जून महिन्यात १८ आणि जुलैत ११ पशुधनाचा बळी गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

घरांसाठी २४ लाखांचा निधी अपेक्षित..अतिवृष्टीत घरे तसेच गोठे, पशुधन, शेतीचे नुकसान झाल्यास शासनाकडून मदत करण्यात येते. जून आणि जुलैमधील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त घरांसाठी सुमारे २४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. जूनमधील घर पडझडसाठी २ लाख ४२ हजार तर जुलैमधील घरांसाठी २१ लाख ४५ हजारांचा निधी अपेक्षित आहे. तर बाधित तीन गोठ्यांसाठी नऊ हजार रुपये मदतीसाठी लागणार आहेत. पशुधनाच्या मृत्युमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी साडे पाच लाखांवर निधी लागणार आहे. जूनमधील पशुधनाच्या मृत्यूसाठी ३ लाख ५६ हजार तर जुलै महिन्यातील मृत जनावरांसाठी २ लाख १३ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस