शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना

By नितीन काळेल | Updated: April 28, 2025 22:53 IST

मेंढपाळाचे लाखोचे नुकसान

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सातारा शहरापासून जवळच असणाऱ्या निकमवाडीत फलटण तालुक्यातील मेंढपाळाच्या २६ मेंढ्यांचा हिवराच्या शेंगा खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी रात्रीच घटनास्थळी पोहोचले. तसेच पुढील उपाययोजना सुरू करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्याच्या आदर्की येथील मेंढपाळ सातारा तालुक्यात आले आहेत. मेंढ्यांच्या चाऱ्याच्या शोधात ते गावोगावी जात आहेत. असे असतानाच सातारा शहरातील शाहूपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर निकमवाडी नंबर दोन (आंबेदरे) आहे. याठिकाणी मेंढ्या चरत होत्या. त्यावेळी मेंढ्यांनी हिवराच्या शेंगा खाल्ल्या. या शेंगाचा त्रास झाल्याने जवळपास २६ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. तर हिवराच्या शेंगा खाल्ल्यानेच पाच मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत पशुसंवर्धन विभागाला सोमवारी सायंकाळी माहिती समजली. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. दिनकर बाेर्डे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार हेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. तसेच पुढील उपाययोजना करण्यास सुरूवात केली. रात्री उशिरापर्यंत अधिकारी घटनास्थळीच होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर