Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेचे पाणी, १०५० क्युसेक विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:08 IST2025-10-21T18:08:02+5:302025-10-21T18:08:35+5:30

कोयनेवर महत्त्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून...

1050 cusecs of water released from Koyna dam for irrigation in Sangli | Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेचे पाणी, १०५० क्युसेक विसर्ग 

Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेचे पाणी, १०५० क्युसेक विसर्ग 

सातारा : सातारा जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाले असून, कोयना धरणही भरले आहे. त्यामुळे वर्षभराचा पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. तर आता सांगली जिल्हा पाटबंधारे मंडळाने सिंचनाची मागणी केली आहे. या मागणीनुसार सोमवारी सकाळपासून कोयनेतून १ हजार ५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.

पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे दरवर्षी कोयना धरण भरते की नाही याकडे साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष असते. यावर्षी जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले आहे. परिणामी, मोठे तसेच मध्यम प्रकल्पही भरून वाहिले. मागील सप्टेंबर महिन्यातच कोयना धरणही पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. आता धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होणार आहे. तर उन्हाळ्याच्या काळात अधिक मागणी राहते. त्यामुळे मागणीनुसार पाणी सोडावे लागते.

सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झाली आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पायथा वीज गृहाचे एक युनिट सुरू केले आहे. या युनिटमधून १ हजार ५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे. या विसर्गाने कोयना नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तर भविष्यात आणखी मागणी झाल्यास कोयना धरणातून जादा पाणी सोडले जाणार आहे. सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून अधिक पाण्याचा विसर्ग केला जातो.

कोयनेवर महत्त्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून...

कोयना धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन सिंचन पाणी योजना अवलंबून आहेत. यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते. तसेच सांगलीमधीलच ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन पाणी योजनाही कोयना धरणावरच अवलंबून आहेत. यामुळे कोयना धरण दरवर्षी भरले की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असते.

Web Title : सतारा: सांगली सिंचाई के लिए कोयना का पानी छोड़ा गया, 1050 क्यूसेक पानी बहा

Web Summary : सिंचाई विभाग के अनुरोध पर कोयना बांध से सांगली की सिंचाई के लिए 1050 क्यूसेक पानी छोड़ा गया। अच्छी बारिश के कारण भरा हुआ कोयना, सांगली और सोलापुर जिलों को लाभान्वित करता है, जिससे टेम्भू, ताकारी और म्हैसाल जैसी प्रमुख सिंचाई परियोजनाओं को मदद मिलती है।

Web Title : Satara: Koyna Water Released for Sangli Irrigation, 1050 Cusecs Discharged

Web Summary : Koyna Dam releases 1050 cusecs of water for Sangli's irrigation following a request from the irrigation department. The release from Koyna, which is full due to good rainfall, benefits Sangli and Solapur districts, supporting key irrigation projects like Tembhu, Takari, and Mhaisal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.