काँगेसच्या वाढीसाठी तरुणांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:36+5:302021-09-03T04:26:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुण युवकांनी पुढाकार घ्यावा. सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ...

The youth should come forward for the growth of the Congress | काँगेसच्या वाढीसाठी तरुणांनी पुढे यावे

काँगेसच्या वाढीसाठी तरुणांनी पुढे यावे

लोकमत न्यूज नेटवर्क

आटपाडी : काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुण युवकांनी पुढाकार घ्यावा. सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष या नात्याने सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन नूतन जिल्हा अध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी दिले.

खानापूर विधानसभा मतदार संघाचे युवक काँगेस अध्यक्ष जयदीप भोसले, युवक नेते राहुल गायकवाड, किरण पवार यांनी आमदार विक्रम सावंत यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.

काँगेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. ग्रामीण भागातील जनता काँगेसच्या विचारधारेला मानणारी आहे. सध्या आघाडी शासनामध्ये काँग्रेस पक्ष आहे. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यत पोहोचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत विक्रम सावंत यांनी व्यक्त केले.

आटपाडी तालुक्यात अनेक नागरिक हे काँग्रेसच्या विचारधारेचे असून, सध्या आटपाडी तालुक्यात पक्ष वाढीसाठी काम करणे गरजेचे आहे. यासाठी जयदीप भोसले, राहुल गायकवाड यांनी संपूर्ण ताकदीने कामास सुरुवात करावी, असे आवाहन सावंत यांनी केले.

Web Title: The youth should come forward for the growth of the Congress