शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

येळापूर, मेणीतील सहा बंधारे वाहून गेले

By admin | Updated: September 13, 2015 00:18 IST

कृषी विभागाकडूृन बांधकाम : चौकशी करुन कारवाईची मागणी

येळापूर : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे अल्प कालावधित वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत असून, या सर्व कामांची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांच्याकडे केली. यावेळी रणधीर नाईक यांनी येळापूर, मेणी, चरण, काळुंद्रे परिसरातील सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे त्याचबरोबर पाझर तलावाची पाहणी केली. येळापूर, मेणी, सावंतवाडी, रांजणवाडी, शिरसटवाडी येथील सिमेंट बंधारे वाहून गेल्याचे, तर मातीचे बंधारे गाळाने भरले असून, शिरसटवाडी पाझर तलावाच्या गळतीबद्दल शेतकऱ्यांनी माहिती दिल्याने त्यांनी वरील सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मेणी खोऱ्यामध्ये गत कालावधित सुमारे ६ सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. ते सर्व बंधारे वाहून गेलेले आहेत. बांधलेले सर्व बंधारे वाहून जाणे धक्कादायक असल्याचे या ठिकाणी पाहणी केली असता आढळून आले. बंधाऱ्याचे आवशेष पाहून निकृष्ट दर्जाचे काम झाले होते, हे यामुळे कळून आले आहे. या बंधाऱ्याची कामे चांगली झाली असती, तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चित लाभ झाला असता. तर अनेक गाळ साठलेले मातीचे बंधारे दगडमातीने भरल्याने ऐन पावसाळ्यात या ठिकाणी एक थेंबही पाणी साठा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करुन उगवलेल्या पिकांना पाणी मिळाले नसल्याने लाखो रुपये अभियंता व अधिकारी यांच्या खिशात गेले. मात्र त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसलाही झाला नाही. यावेळी मेणी खोऱ्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्याच्या समस्या मांडल्या, तर नाईक यांनी जलयुक्त शिवार योजनेतील जलसंधारणाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने आत्माराम सावंत, शिवाजी शिरसट, आत्माराम नेर्लेकर, खाशाबा पाटील, हरिबा शिरसट, अशोक कुंभार, आनंदराव वाघमारे, महादेव पाटील, शामराव पाटील, आकाराम निकम, मोहन आटुगडे यांनी अडचणी मांडल्या. यावेळी ग्लुकोजचे संचालक गजानन पाटील, सुभद्रा आटुगडे, दगडू सावंत, सरपंच संजय बेंगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)