विद्युत माेटारीची वायर लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST2021-04-10T04:27:20+5:302021-04-10T04:27:20+5:30

शिराळा : निगडी (ता. शिराळा) येथील शेतकरी तुकाराम बापू साळुंखे यांच्या विद्युत मोटारीची ४० हजार रुपये किमतीची ७०० फूट ...

Wire lamp of electric matrix | विद्युत माेटारीची वायर लंपास

विद्युत माेटारीची वायर लंपास

शिराळा : निगडी (ता. शिराळा) येथील शेतकरी तुकाराम बापू साळुंखे यांच्या विद्युत मोटारीची ४० हजार रुपये किमतीची ७०० फूट लांबीची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत साळुंखे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

निगडी येथील तुकाराम साळुंखे यांनी मानकरवाडी येथील तलावातून शेतीसाठी पाणी आणले आहे. यासाठी अंत्री बुद्रुक हद्दीत विद्युत मोटार बसविली आहे. दररोज ते येथील मोटर मोबाईलच्या सहाय्याने चालू करतात. शुक्रवारी सकाळी मोटर सुरू न झाल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मोटारीच्या वायरची चोरी झाल्याचे लक्षात आले. विद्युत मोटारीची ७०० फूट लांबीची वायर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार त्यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे. अंदाजे ४० हजार रुपये किमतीची ही वायर आहे. अधिक तपास हवालदार विनोद पाटील करत आहेत.

Web Title: Wire lamp of electric matrix