शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला आता तरी जाग येणार का?

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

द्राक्ष बागायतदाराची आत्महत्या : ठोस उपाययोजनांची आवश्यकता

तासगाव : डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील द्राक्षबागायतदार शेतकरी बजरंग झांबरे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या विचार करायला लावणारी आहे. सातत्याने शेतीचे नुकसान होत असताना, शासनाकडून मात्र केवळ पंचनाम्याची मलमपट्टी केली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता झांबरेंच्या आत्महत्येने तरी शासनाचे डोेळे उघडणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यासह देशाच्या बाजारपेठेत तासगावची द्राक्षे आणि बेदाण्याचा मोठा नावलौकिक आहे. द्राक्षाबागांच्या जोरावर तासगावची ओळख सधन तालुका म्हणून झाली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल द्राक्षपिकाकडेच राहिला आहे. इथला शेतकरी सधन आहे असे म्हटले जात असले तरी, दहा-बारा वर्षातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि अलीकडच्या तीन-चार वर्षातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.द्राक्षबाग उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्यामुळे इथल्या शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्यायच राहात नाही. एकीकडे कर्ज आणि दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे नियोजन केवळ कागदावरच राहिले. त्यामुळेच तालुक्यातील बहुतांश शेतकरी कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी एकमेव साधन असलेली शेतीच वर्षानुवर्षे नुकसानीत चालली आहे. अशा परिस्थितीने खचून गेल्यामुळेच झांबरेंसारख्या शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला.दुष्काळ असो वा अवकाळीने झालेले नुकसान, शासनाकडून केवळ पंचानाम्यांचा कागदोपत्री फार्स करून तुटपुंजी मदत शेतकऱ्याच्या झोळीत टाकण्याचा सोपस्कार वर्षानुवर्षे चालत आला आहे. अगदी आघाडी सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतरही हाच प्रकार सुरु आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानीवर उपाययोजना करण्याची तसदी सरकारी यंत्रणा घेताना दिसून येत नाही. सलग तीन वर्षे अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी बागेवर शेडनेट टाकून नुकसान टाळण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अशा नवीन प्रयोगाची अंमलबजावणी शासकीय योजनेच्या माध्यमातून केल्यास, त्यासाठी अनुदान उपलध करुन दिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळता येऊ शकते. मात्र हे करण्यासाठी शासनाचे डोळे उघडणार कोण? असाच प्रश्न आहे. बजरंग झांबरेंनी आत्महत्या केली. आमदार, खासदार, मंत्री येतील; सांत्वन करुन जातील. प्रशासनाकडून तुटपुंज्या मदतीचा फार्स केला जाईल. यापेक्षा वेगळे काही साध्य होईल, अशी अपेक्षा कोणालाच नाही. पण शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी कायमस्वरुपी व ठोस अशा उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही, तर सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहील. (वार्ताहर)मदत वेळेवर मिळणे गरजेचेराज्यासह देशाच्या बाजारपेठेत तासगावची द्राक्षे आणि बेदाण्याचा मोठा नावलौकिक आहे. द्राक्षबाग उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्यायच राहात नाही. मात्र निसर्गाच्या लहरीपणाने अतोनात कष्ट व खर्च घेऊन जगविलेल्या द्राक्षबागा वादळी पावसात डोळ्यांदेखत नष्ट होताना पाहिल्यावर शेतकरी खचून जातो. त्याचवेळी सरकारी पातळीवरील अनास्था त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडते. त्यामुळे शासकीय मदत वेळेवर मिळणे गरजेचे आहे.