ाीस वाळू तस्करांना मोक्का लावणार

By Admin | Updated: December 27, 2016 00:57 IST2016-12-27T00:57:21+5:302016-12-27T00:57:21+5:30

चंद्रकांतदादा पाटील : अधिकाऱ्यांच्या शर्टालाही हात लावू देणार नाही

Will be able to confront the Zise Sand smugglers | ाीस वाळू तस्करांना मोक्का लावणार

ाीस वाळू तस्करांना मोक्का लावणार

सांगली : अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांकडून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र आता असे हल्ले रोखण्यासाठी महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. वाळू तस्करांची दादागिरी मोडून काढण्यासाठी महिनाभरात जिल्ह्णातील २५ ते ३० वाळू तस्करांना ‘मोक्का’ लावणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार बैठकीत दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने महसूलमंत्री पाटील सांगलीत आले होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाळू तस्करांवरील कारवाईबाबत माहिती दिली. सरकारी अधिकाऱ्यांच्या शर्टालाही हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पाटील म्हणाले की, जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अवैध वाळू उपशावर कारवाई करताना तस्करांकडून हल्ले होत आहेत. वाळू तस्करांची ही दादागिरी खपवून घेणार नसून, येत्या महिनाभरात जिल्ह्यातील २५ ते ३० वाळू तस्करांवर ‘मोक्कां’तर्गत कारवाई करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राजकारण्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना चाप लावला आहे. त्याच धर्तीवर दबाव झुगारून वाळू तस्करांवर कारवाई करण्यात येणार आहे. महसूल अधिकाऱ्यांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. यावर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी सर्व महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांची ९ जानेवारीला बैठक आयोजित करण्यात येणार असून, यात वाळू तस्करांवरील कारवाईबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे.
यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Will be able to confront the Zise Sand smugglers