शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाणी न देणारे सरकार काय कामाचे?

By admin | Updated: October 9, 2014 23:39 IST

राजनाथसिंह : विट्यातील सभेत काँग्रेस, राष्ट्रवादीवर हल्लाबोल

विटा : महाराष्ट्राचा विकास भाजपशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे केंद्रात भाजपकडे जशी एकहाती सत्ता दिली तशी महाराष्ट्रातही द्या, असे आवाहन करतानाच जे शेती व पिण्यास पाणी देऊ शकत नाहीत, ते सरकार काय कामाचे? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी विटा येथील कार्यक्रमात उपस्थित केला.विटा येथे आज गुरुवारी भाजपची प्रचारसभा पार पडली. राजनाथसिंह म्हणाले, महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे गेली १५ वर्षे सरकार होते. परंतु, या सरकारने काय केले? आदर्श, सिंचन घोटाळ्यासह शेतकरी आत्महत्या आणि राज्यात सुमारे १ हजार ३६२ बलात्काराच्या घटना झाल्या तरी, महाराष्ट्र हा क्रमांक एकवर असल्याचे सांगितले जाते. भाजपचे देशातील पाच राज्यात सरकार आहे. त्यांचीही कामे बघा. देशात भाजपचे बहुमताने सरकार स्थापन झाले. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधित पेट्रोल व डिझेलच्या किमती तीनवेळा कमी झाल्या. आणखीही पेट्रालचे दर कमी होणार आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते केवळ सत्तेसाठी व स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, आपण केंद्रात भाजपचे बहुमताने सरकार आणून कुर्ता चढविला, तसा महाराष्ट्रातही भाजपचे बहुमताने सरकार आणून पायजमा चढवावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक अनिल म. बाबर यांनी केले. यावेळी गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गणेश देसाई, रूपाली मेटकरी, दिलीप आमणे, अ‍ॅड. विनोद गोसावी, तानाजी यमगर, कुमार लोटके, शुभांगी सुर्वे, विठ्ठलराव मोरे, बंडोपंत देशमुख, बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. आभार कुमार लोटके यांनी मानले. (वार्ताहर)पाकिस्तानला इशारा...जत : पाकिस्तानकडून सीमारेषेचे वारंवार उल्लंघन होत आहे. परंतु, त्याला आपले जवान जशास तसे उत्तर देत आहेत. भारताची इंच न् इंच जमीन आपली आहे. त्यावर कोणी नजर ठेवत असले तर, त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. सैनिकच उत्तर देत असल्यामुळे आम्हाला परत यासंदर्भात उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे राजनाथसिंह यांनी जत येथील सभेत सांगितले. पाकिस्तानकडून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताची सुरक्षाव्यवस्था सक्षम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजयकाकांची गैरहजेरीया सभेस भाजपचे खा. संजयकाका पाटील आले नाहीत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती सभास्थळी चर्चेचा विषय बनली होती.देशात सत्ता येऊन फक्त चार महिने झाले आहेत. या चार महिन्यांत वाढती महागाई कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पेट्रोल व डिझेलचे प्रतिलिटर दर सतत कमी केले आहेत. खत सबसिडी अनुदान यापुढे थेट शेतकऱ्यांना देणार आहे; उद्योगपतींना देणार नाही, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जत येथे भाषणाची सुरुवात मराठीतून करताना, मी शुद्ध मराठी बोलू शकत नसलो, तरी समजू शकतो, असे सांगितले.