शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी ३१ वर्षांत काय साधले?

By admin | Updated: November 18, 2016 23:13 IST

सदाभाऊ खोत : आता धार्मिक स्थळांना भेटी द्यायची तयारी करा ! इस्लामपुरात प्रचार सभा

इस्लामपूर : शहरवासीयांनी सत्ताधाऱ्यांना ३१ वर्षे एकहाती सत्ता दिली, तरीही विकासाच्या नावाने बोंबाबोंबच आहे. अजून आम्हाला सेवा करायची संधी द्या, अशी विनंती सत्ताधारी करत आहेत. मग तुम्हाला ३१ वर्षे गुरे राखायला सोडले होते काय? सत्ताधाऱ्यांनी आता सेवेसाठी पंढरपूर, शिर्डी, काशी अशा धार्मिक स्थळी जावे. त्यांच्या सेवेतून अपुरे राहिलेले शहराचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.इस्लामपूर येथे विकास आघाडीच्या प्रचारार्थ प्रभाग क्ऱ ६, ७, ८ व १२ मध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते़ आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत पाटील, आघाडीचे विक्रम पाटील, जि. प़ सदस्य सम्राट महाडिक, राहुल महाडिक, मुकुंद कांबळे, दि़ बा़ पाटील, मुनीर इबुशे, भास्कर कदम, कपिल ओसवाल, नजीर वलांडकर, सतीश महाडिक उपस्थित होते.निशिकांत पाटील म्हणाले, शहरातील दहशतीचे राजकारण यापुढे चालू दिले जाणार नाही़ मुस्लिम व दलित समाजाची धार्मिक कार्यक्रमापुरतीच आठवण येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनता स्वीकारणार नाही़ हिंदू-मुस्लिम ऐक्य असणारं हे शहर असून ३१ वर्षांच्या एकहाती राजवटीला सुरुंग लावायची वेळ आली आहे़ परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य प्रत्येक नागरिकाला लाभणार आहे.जि़ प़ सदस्य सम्राट महाडिक म्हणाले, निशिकांत भोसले हे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार विकास आघाडीला लाभले, हाच पहिला विजय झाला आहे. दादांची दूरदृष्टी, सुसंस्कृत विचारच शहराचा विकास करु शकतात. यासाठी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे.यावेळी उमेदवार सौ़ आशा पवार, सत्यवान रासकर, सौ़ रूक्साना इबुशे, चेतन शिंदे, सौ़ अन्नपूर्णा फल्ले, अमित ओसवाल, जलाल मुल्ला, सौ. रूपाली साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी नागरिक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)मुंगळ्याप्रमाणे सत्तेला चिकटले सदाभाऊ खोत म्हणाले, अलीकडच्या दोन वर्षात राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यामुळे निधी आला नाही, असा आरोप सत्ताधारी करीत असले तरी, ३१ वर्षांच्या सत्ताकाळात काय दिवे लावले ? पालिकेच्या सत्तेच्या खुर्चीला मुंगळा चिकटावा, तसे कित्येक वर्षे चिकटून बसलात. तुमच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे.