शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी ३१ वर्षांत काय साधले?

By admin | Updated: November 18, 2016 23:43 IST

सदाभाऊ खोत : आता धार्मिक स्थळांना भेटी द्यायची तयारी करा ! इस्लामपुरात प्रचार सभा

इस्लामपूर : शहरवासीयांनी सत्ताधाऱ्यांना ३१ वर्षे एकहाती सत्ता दिली, तरीही विकासाच्या नावाने बोंबाबोंबच आहे. अजून आम्हाला सेवा करायची संधी द्या, अशी विनंती सत्ताधारी करत आहेत. मग तुम्हाला ३१ वर्षे गुरे राखायला सोडले होते काय? सत्ताधाऱ्यांनी आता सेवेसाठी पंढरपूर, शिर्डी, काशी अशा धार्मिक स्थळी जावे. त्यांच्या सेवेतून अपुरे राहिलेले शहराचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. इस्लामपूर येथे विकास आघाडीच्या प्रचारार्थ प्रभाग क्ऱ ६, ७, ८ व १२ मध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते़ आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत पाटील, आघाडीचे विक्रम पाटील, जि. प़ सदस्य सम्राट महाडिक, राहुल महाडिक, मुकुंद कांबळे, दि़ बा़ पाटील, मुनीर इबुशे, भास्कर कदम, कपिल ओसवाल, नजीर वलांडकर, सतीश महाडिक उपस्थित होते. निशिकांत पाटील म्हणाले, शहरातील दहशतीचे राजकारण यापुढे चालू दिले जाणार नाही़ मुस्लिम व दलित समाजाची धार्मिक कार्यक्रमापुरतीच आठवण येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनता स्वीकारणार नाही़ हिंदू-मुस्लिम ऐक्य असणारं हे शहर असून ३१ वर्षांच्या एकहाती राजवटीला सुरुंग लावायची वेळ आली आहे़ परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य प्रत्येक नागरिकाला लाभणार आहे. जि़ प़ सदस्य सम्राट महाडिक म्हणाले, निशिकांत भोसले हे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार विकास आघाडीला लाभले, हाच पहिला विजय झाला आहे. दादांची दूरदृष्टी, सुसंस्कृत विचारच शहराचा विकास करु शकतात. यासाठी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे. यावेळी उमेदवार सौ़ आशा पवार, सत्यवान रासकर, सौ़ रूक्साना इबुशे, चेतन शिंदे, सौ़ अन्नपूर्णा फल्ले, अमित ओसवाल, जलाल मुल्ला, सौ. रूपाली साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी नागरिक आदी उपस्थित होते. (वार्ताहर) मुंगळ्याप्रमाणे सत्तेला चिकटले सदाभाऊ खोत म्हणाले, अलीकडच्या दोन वर्षात राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यामुळे निधी आला नाही, असा आरोप सत्ताधारी करीत असले तरी, ३१ वर्षांच्या सत्ताकाळात काय दिवे लावले ? पालिकेच्या सत्तेच्या खुर्चीला मुंगळा चिकटावा, तसे कित्येक वर्षे चिकटून बसलात. तुमच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे.