कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:06+5:302021-02-05T07:29:06+5:30

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाट्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने ...

The weight of Krishna factory is accurate | कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक

कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाट्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने तपासणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले.

सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी काढले आहेत. यानुसार कऱ्हाडचे नायब तहसीलदार व्ही. आर. माने, वैधमापनशास्त्र निरीक्षक आर. पी. आखरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साजीद मुल्ला, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार, विश्वास जाधव, सुनील कोळी यांनी संयुक्तपणे कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन तपासणी केली. उसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलावण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले.

तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृष्णा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला.

यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, अवधूत रेणावीकर, जी. बी. मोहिते, आर. डी. पाटील, विजय मोहिते उपस्थित होते.

फोटो- २५०१२०२१-आयएसएलएम-शिरटे न्यूज

रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात नायब तहसीलदार व्ही. आर. माने, आर. पी. आखरे यांनी वजनकाट्याचे मोजमाप केले.

Web Title: The weight of Krishna factory is accurate