शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारासह आनंदी मनाचे शस्त्र कोरोनाला हरवेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST

डॉ. दिलीप पटवर्धन (एमएस, ऑप्थामॉलॉजी) कोनावर लस निघाली; पण भीतीवर अद्याप अैाषध सापडलेले नाही. सध्यातरी प्रतिकारशक्ती वाढविणे हाच एकमेव ...

डॉ. दिलीप पटवर्धन (एमएस, ऑप्थामॉलॉजी)

कोनावर लस निघाली; पण भीतीवर अद्याप अैाषध सापडलेले नाही. सध्यातरी प्रतिकारशक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय आहे. मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हा महत्त्वाचा मार्ग आहे.

जीवनसत्वांनी युक्त चौरस आहार कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाचा ठरला आहे. क आणि ड जीवनसत्वांची पोषणमूल्ये विषाणूच्या संसर्गापासून वाचवतात. त्याशिवाय सात ते नऊ तासांची शांत झोपही अत्यंत महत्त्वाची. टिव्ही किंवा मोबाइलच्या काचेवर डोळे टिकवून रात्र-रात्र जागरणाने प्रकृतीचे होणारे मातेरे कोरोनाच्या संसर्गाकडे घेऊन जाते. रोज नित्यनेमाने व्यायाम, योगा यामुळे शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती मिळते. एक लक्षात ठेवले पाहिजे की, सर्वात अगोदर माणसाचे मन आजाराला बळी पडते, त्यानंतर शरीरात विकाराचा शिरकाव होतो. त्यामुळे सुंदर मनाची माणसे सहसा आजारी पडत नाहीत, हे लक्षात घ्या. खुंटलेल्या मनाची आणि बुरसटलेल्या विचारांची माणसे कोरोनाला प्रोत्साहन देतात, त्यामुळे मन आनंदी ठेवा. सकारात्मक व सहकारात्मक विचारसरणीचा अंगिकार करा. याच विषयावर डॉ. एलिझाबेथ ब्लॅक बर्न या पाश्चिमात्य महिलेने २००९ मध्ये प्रबंध सादर करून नोबेल पारितोषिक मिळविले आहे. सकारात्मक व आनंदी मनामुळे टेलो मियरची लांबी वाढून ते जनुकांचे रक्षण करतात, त्यातून रोग प्रतिकारकशक्ती वाढते, हे सिद्ध केले आहे.

कोरोनाबाधितांचे आणि मृत्यूचे दररोजचे आकडे निराशेला वाव देतात. मानसिक खच्चीकरण करतात. त्यामुळेही मानसिक दौर्बल्य येऊन लोक कोरोनाचे शिकार ठरतात. जगभरात दहा टक्के लोकसंख्येला नैराश्याने ग्रासले आहे, त्यात आपला समावेश होऊ नये, याची काळजी घेऊ या. वास्तविक क्षयरोग अधिक भयानक व जास्त संसर्गजन्य रोग आहे. क्षयाने भारतात दररोज १२०० हून अधिक लोक मरण पावतात; पण त्यापेक्षा कोरोनाचीच भीती समाजमनाला ग्रासून टाकत आहे. फुप्फुसातील रिॲक्शनने मृत्यू ओढवतो, त्यामुळे श्वसनाचे व्यायाम महत्त्वाचे आहेत. ओणवे होऊन श्वास घेणे, वाफ घेणे हे सुद्धा सोपे उपाय आहेत. त्याशिवाय लस घेणे हादेखील उपाय आहे.

(लेखक सांगलीतील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व जीवनविद्या मिशनचे अभ्यासक आहेत.)