शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावांचा पाणी पुरवठा अखेर सुरळीत

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

वीज बिल भरले : माळवाडी, खंडोबाचीवाडी, चोपडेवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय दूर

भिलवडी : वीज कनेक्शन तोडल्याने पलूस तालुक्यातील माळवाडी, खंडोबाचीवाडी, चोपडेवाडी या गावांचा बंद असलेला पाणी पुरवठा सलग तीन दिवसांनंतर पूर्ववत सुरू झाला आहे. पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी तिन्ही ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून वीज बिलाची बाकी भरण्यासाठी योग्य तोडगा काढला. या तिन्ही गावांची मिळून संयुक्त अशी नळ पाणी पुरवठा योजना आहे. त्याचे वीज बिल साडेसहा ते सात लाख रूपये थकित आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने बिल भरल्याशिवाय कनेक्शन सुरू करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. यामुळे गेले तीन दिवस या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. माळवाडी ग्रामपंचायतीची ६० टक्के, खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत २१ टक्के, तर चोपडेवाडी ग्रामपंचायतीची १९ टक्के, अशी वीज बिलाची रक्कम भरण्याचे विवरण आहे. पलूस पंचायत समितीचे सभापती विजय कांबळे, माळवाडीचे सरपंच जनार्दन साळुंखे, गजानन मोहिते, चोपडेवाडीचे उपसरपंच रवींद्र यादव, खंडोबाचीवाडीचे नेते माणिक माने, सरपंच सौ. रूपाली बाबर, उपसरपंच विशाल शिंदे, संदीप माळी, महादेव महिंद आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.वीज बिलाची रक्कम कोणी किती भरली व देणे कोण आहे, यावरून सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. यावेळी संदीप राजोबा यांनी, पाठीमागील सात वर्षांचा वीज बिलाचा ताळेबंद सर्वांनी तयार करावा व कोणती ग्रामपंचायत थकित आहे ते बघून वसुलीसाठी तोडगा काढावा, असे सुचविले. यावेळी खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीने पन्नास हजार व चोपडेवाडी ग्रामपंचायतीने पन्नास हजार, असे मिळून एक लाख रूपये भरले. त्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने रविवारी सकाळपासून तिन्ही गावांना पाणी पुरवठा नियमितपणे सुरू झाला.(वार्ताहर)‘लोकमत’चे अभिनंदन सलग तीन दिवस पाणी पुरवठा बंद असल्याचे सडेतोड वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी धावपळ करून तात्काळ योग्य तो तोडगा काढला. याबाबत ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.