शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला आकृतिबंधाच्या मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: November 26, 2015 00:16 IST

मनुष्यबळ वाढणार : खासगी बँकांशी स्पर्धेची तयारी; नव्या उपक्रमांना होणार मदत

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला स्पर्धात्मक पातळीवर उतरून प्रगतीची नवी उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी नव्या आकृतीबंधाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. आकृतिबंधाचा प्रस्ताव सध्या राज्याच्या सहकार विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचारी भरतीचे सर्वात मोठे विघ्न दूर झाले आहे. प्रशासकांच्या कालावधित व त्यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या कालावधितही जी गोष्ट शक्य झाली नाही, ती गोष्ट आता शक्य होत आहे. जिल्हा बँकेला रिक्त पदांच्या भरतीची गरज वारंवार भासत आहे. १ हजार कर्मचाऱ्यांच्या जोरावर बँकेचा कारभार सुरू आहे. सर्वात जास्त उलाढाल असणाऱ्या या बँकेचा गाडा कमी कर्मचाऱ्यांवर सुरू होता. अनेक नव्या योजना व उलाढाल वाढीच्यादृष्टीने जादा कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली होती. रिक्त पदांचा विचार करता, बँकेला १ हजार ४०४ पदांचा आकृतिबंध अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा आकृतिबंध आता १ हजार ५३० पर्यंत गेला आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा चांगला आकृतिबंध तयार झाला. हा प्रस्ताव आता सहायक आयुक्त तसेच नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. नव्याने बँकेला सॉफ्टवेअर व हार्डवेअर इंजिनिअर्सची पदे भरावी लागणार आहेत. याशिवाय अन्य बऱ्याच तांत्रिक पदांचा समावेश यात झाला आहे. बँकेकडील खेळते भांडवल, शाखानिहाय उलाढाल व खेळते भांडवल यावर पदांचा आकृतिबंध अवलंबून आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती, उलाढाल चांगली असल्याने आकृतिबंधही तितकाच सक्षम झाला आहे. नव्या पदांच्या भरतीस मंजुरी मिळाल्यानंतर बँकेच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची चिंता दूर होणार आहे. आकृतिबंधानुसार भरती झाली, तर बँकेला नव्या योजना, उलाढाल वाढीचे प्रयत्न या सर्व गोष्टी करता येऊ शकतात. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने अनेक नव्या योजना आता संचालक मंडळ तसेच तांत्रिक समितीने मंजूर केल्या आहेत. (प्रतिनिधी)मार्ग मोकळा होणार ४जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. नाबार्डच्या सूचनेप्रमाणे पदांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. खेळते भांडवल, शाखानिहाय उलाढाल आदी निकषांवर आधारित आराखड्याअंतर्गत एकूण १ हजार ५३० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या बॅँकेत १ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आराखडा मंजूर झाल्यानंतर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.