शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विकास बुडाला, भूखंड माफियांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरात भूखंड माफियांनी दहशतीबरोबर राजकारणातही ताकद वाढविण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यांच्यावर राजकारण्यांचा ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरात भूखंड माफियांनी दहशतीबरोबर राजकारणातही ताकद वाढविण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यांच्यावर राजकारण्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे शहरातील विकासाला खीळ बसली आहे. पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात विकासाचे तीन-तेरा वाजले आहेत.

मागील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत शहरातील विकास कामांना गती मिळाली, परंतु त्यांचा निकृष्ट दर्जा वेळोवेळी स्पष्ट झाला आहे. विकास आराखड्याचे घोंगडे भिजत पडले होते. याचा फायदा भूखंड माफियांनी उठवला आहे. काहींनी मोकळ्या जागांवर बेकायदेशीर कब्जा करून त्या हडप केल्या आहेत. त्यांची पाठराखण काही राजकीय नेते करताना दिसतात. गुंठेवारीचे नियम धाब्यावर बसवून शहरात बेसुमार बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. आणेवारीतील जागाही भूखंड माफियांनी सोडलेल्या नाहीत.

नगरपालिका निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भुयारी गटारी योजनेचे काम पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. परंतु मल:निस्सारण प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे रस्त्यांची कामेही अडकून पडली आहेत. आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने रोगराईचा संसर्ग वाढत आहे. शहरालगतच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. विकासापेक्षा जमिनींच्या व्यवहारात बहुतांशी राजकीय नेते गुुंतले आहेत. सामान्य नागरिक आयुष्यभर मिळविलेली रक्कम घेऊन घर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अडचणी येत आहेत.

कोट

भुयारी गटारीचे काम जलद गतीने व्हायला हवे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी पालिकेसाठी साडेतेरा कोटीचा निधी आणला आहे. रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. त्याचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडले जात आहे.

- शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी, इस्लामपूर.