शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
7
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
8
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
9
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
10
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
11
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
12
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
13
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
14
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
15
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
16
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
17
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
18
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
19
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
20
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वारणा धरणाचे पाणी रोखले

By admin | Updated: April 23, 2015 00:04 IST

आंदोलकांचा रेटा : प्रत्यक्ष अंमलबजावणीशिवाय माघार नाही

शिराळा : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे अखेर बुधवारी वारणा धरणातून व कालव्यातून सुटणारे पाणी धरणाच्या अधिकाऱ्यांना बंद करावे लागले. जोपर्यंत धरण व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत राज्यातील धरण व प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय श्रमिक मुक्ती दलाने घेतला.
बुधवारी दुपारी बारा वाजता मणदूर येथील हुतात्मा स्मारकापासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो धरण व प्रकल्पग्रस्त वारणा धरणाकडे मोर्चाने शासनाविरोधात घोषणा देत निघाले. मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व सदस्य मारूती पाटील, वसंत पाटील, संतोष गोल्ल, डी. के. बोडके, दाजी शेलार, पांडुरंग कोठारी, आनंदा वकटे आदिंनी केले.
धरणाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यावेळी धरणग्रस्तांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मारूती पाटील, वसंत पाटील यांची भाषणे झाली.
वारणा धरणाचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट ठेवून डॉ. भारत पाटणकर, तसेच धरण व प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच धरण व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबाबत बैठकीच्या नियोजनाची तयारी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी चांदोलीचे वन शाखा अभियंता प्रदीप कदम उपस्थित होते. कोकरूड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम शेडबाळे यांनी शांततेच्या
मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची विनंती केली.
दरम्यान, कोयना अभयारण्यातील पुनर्वसन झालेल्यांच्या शिशिंगे, झाडोली, डिचोली या मूळ गावी जाऊन घरांचे मूल्यांकन करण्याचे आदेश वन संरक्षक, कोल्हापूर २७ एप्रिल रोजी देणार असल्याची माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. (वार्ताहर)