महाडिक शैक्षणिक संकुलात सोमवारी लसीकरण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:32+5:302021-09-25T04:27:32+5:30

इस्लामपूर : श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित महाडिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाडिक उद्योग समूहातील विविध ...

Vaccination campaign on Monday at Mahadik Educational Complex | महाडिक शैक्षणिक संकुलात सोमवारी लसीकरण अभियान

महाडिक शैक्षणिक संकुलात सोमवारी लसीकरण अभियान

इस्लामपूर : श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित महाडिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाडिक उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी कोरोना लसीकरण अभियान राबविले जाणार आहे. याचे आयोजन सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली.

सद्यस्थितीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक व प्रभावी उपाययोजना म्हणून लसीकरण हा सक्षम पर्याय ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लसीकरणामुळे कमी होत आहे. शासन नियमांचे पालन करून येत्या काही कालावधीमध्ये महाविद्यालय पूर्ववत सुरू करण्याचे नियोजन असून त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट यांच्या पुढाकारातून सामाजिक जाणिवेतून या अभियानाचे आयोजन केले आहे.

Web Title: Vaccination campaign on Monday at Mahadik Educational Complex