शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘भू-विकास’चे कर्मचारी करणार अनोखे आंदोलन

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

शासनाला पत्र देणार : आत्महत्येच्या परवानगीची मागणी

सांगली : धुळे येथील भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आत्महत्येच्या परवानगीची मागणी केल्यानंतर, राज्यातील अन्य जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांकडूनही अशाच पद्धतीची मागणी करण्यात येणार आहे. या अनोख्या मागणीपत्राच्या आंदोलनातून भू-विकास बँकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे कर्मचारी संघटनेमध्ये नाराजी पसरली आहे. ‘भू-विकास’च्या राज्यातील २९ जिल्हा शाखा आणि एक शिखर बँक अस्तित्वात आहे. याशिवाय उपशाखांचीही संख्या मोठी आहे. या बँकांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रश्नावर नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीने बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीतून कर्मचाऱ्यांची देणी देण्याचा व शासकीय नोकरीत त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी, बँका बंद करण्याच्या निर्णयामुळे कर्मचारी संघटनेत नाराजी पसरली आहे. धुळे येथील कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांसह त्रिसदस्यीय समितीला पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी आत्महत्येच्या परवानगीची मागणी केली. विरोधात असताना फडणवीस आमच्यासोबत होेते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रश्न सुटण्याऐवजी बँका कायमच्या बंद करण्याचा निर्णय होत आहे. थकित पगार, थकित येणी यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे आता भू-विकास बँक कर्मचाऱ्यांवरही आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असा उल्लेख या पत्रात आहे. राज्य भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सांगितले की, या पत्राची प्रत सर्व जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांकडेही गेली आहे. त्यामुळे आता राज्यभरातून अशी पत्रे पाठवून सरकारचे लक्ष वेधणार आहोत. राज्यातील भू-विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार असला तरी, तो कर्जवसुलीवर अवलंबून आहे. बँका बंद करून मोबदला देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी कधीच केली नाही. याउलट बँकांचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी वारंवार संघटनेने केली आहे. अजूनही याच मुद्यावर संघटनेचा सरकारशी संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हिताची राज्यातील सर्वात महत्त्वाची बँक म्हणून सरकारने याबाबत विचार केला पाहिजे, असे संघटनेचे मत आहे. (प्रतिनिधी)