शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पोस्टामार्फत आतापर्यंत 52 लाख 26 हजार रुपयांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 18:39 IST

सदर आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. या आपत्तीतून सावरण्यासाठी आपलाही हातभार असवा या जाणीवेतून रामचंद्र साळुंखे  यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला आहे. श्री साळुंखे यांनी केलेली मदत ही अत्यंत मोलाची असून त्यांच्या संवेदनशिलतेबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले.

ठळक मुद्देपोस्टामार्फत वितरणात राज्यात सांगली जिल्हा प्रथमरामचंद्र साळुंखे यांनी एक महिन्याचा पगार दिला मुख्यमंत्री सहायता निधीस- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये नागरिकांची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी गावातील पोस्ट कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या पोस्टमनना मोबाईल व बायोमेट्रीक डिव्हाईस देण्यात आले आहे. बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी या सुविधेचा उपयोग करण्यात येत असून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिनांक 2 ते 14 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील 3 हजार 3 महिलांना आधार एनेब्लड पेमेंटसिस्टीमद्वारे 52 लाख 26 हजार 116 रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. राज्यात या योजनेअंतर्गत पोस्टामार्फत सर्वात जास्त निधी सांगली जिल्ह्यात वितरित करण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोस्ट विभागाचे कौतुक केले आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कमर्शिअयल बँकांकडील 2 लाख 66 हजार 493 पात्र लाभार्थी आहेत. यामधील 1 लाख 14 हजार 516 लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यातील विविध पोस्ट कार्यालयांकडे पाठविण्यात आले आहे. पोस्ट ऑफिसच्या इंडियापोस्ट पेमेंट बँक मार्फत देण्यात येणाऱ्या अएढर सुविधेद्वारे नागरिक स्वत:च्या कोणत्याही बँक खात्यावरील रक्कम गावातील पोस्ट ऑफिसमध्ये काढू शकतात. यासाठी बँक खात्यालाआधारकार्ड सिडींग असणे आवश्यक आहे. सदर नागरिक पोस्ट पेमेंट बँकचा ग्राहक असला किंवा नसला तरी त्याला त्याचा लाभ घेता येईल. पैसे काढण्यासाठी फक्त आधार आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. ग्राहकांचा फक्त आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करुन ते पैसे काढू शकतात.

गावातील पोस्टमन त्याच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या रक्कमेनुसारही सुविधा देऊ शकेल त्यासाठी फोनवरुन त्यांना संपर्क करुन त्यांना संपर्क करुन त्यांना आपल्या घरी बोलवू शकता किंवा शक्य असल्यास पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन व्यवहार करुशकता असे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, सांगलीचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पासंगराव यांनीयावेळी सांगितले. जिल्ह्यात पोस्टाच्या 419 शाखा असून ग्रामीण भागात 337 शाखा तर शहरी आणि निमशहरी भागात 80 शाखा आहेत. इंडियापोस्ट पेमेंट बँकेमार्फत इतर बँकिंग सेवाही तत्परतेने दिल्या जातात. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.*रामचंद्र साळुंखे यांनी एक महिन्याचा पगार दिलामुख्यमंत्री सहायता निधीसजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून कौतुकसांगली : जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथेशिपाई पदावर कार्यरत असणारे रामचंद्र गोपाळ साळुंखे यांनी कोविड-19 साठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपला एक महिन्याचा पगार रुपये 28 हजार 473 चा धनादेश आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचेकडे सुपुर्द केला कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपुर्ण जगभर थैमान घातले आहे. देशातही याचा प्रादुर्भाव वाढत आहे. सदर आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.या आपत्तीतून सावरण्यासाठी आपलाही हातभार असवा या जाणीवेतून रामचंद्र साळुंखे  यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला आहे. श्री साळुंखे यांनी केलेली मदत ही अत्यंत मोलाची असून त्यांच्या संवेदनशिलतेबद्दलजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीPost Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसा