शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील दोन हजार गुंड रडारवर!

By admin | Updated: September 23, 2014 23:54 IST

विधानसभा निवडणूक : पोलीस प्रमुखांकडून जिल्ह्याचा दौरा

सचिन लाड-सांगली -विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दोनपेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे. सुमारे दोन हजार गुंड कारवाईसाठी पोलिसांच्या रडारवर आहेत. यातील पाचशेहून अधिक गुन्हेगारांवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत जिल्ह्याचा दौरा करून शांततेसाठी थेट लोकांशी संवाद साधत आहेत.निवडणुकीत वाद-विवाद व प्रसंगी हाणामारीचे प्रकार घडतात. सांगली जिल्ह्याची संवेदनशील म्हणून ओळख आहे. यामुळे सावंत यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे. दररोज नाकाबंदी करून, दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांची धरपकड केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरारी असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गर्दी मारामारी यासह दोनपेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी यादी काढण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी यादी काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)सांगलीचे कारागृहखचाखच भरलेपोलिसांनी सुरू केलेली प्रतिबंधात्मक कारवाई व बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटमुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजअखेर (मंगळवार) ३७८ कैदी असून, यामध्ये ३६५ पुरुष व १३ महिलांचा समावेश आहे. यापूर्वी वकिलांनी खंडपीठासाठी केलेल्या आंदोलनावेळी कैद्यांना जामीन मंजूर न झाल्याने ही संख्या ३८५ पर्यंत गेली होती. कैद्यांची संख्या वाढली असली, तरी त्याचा कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे अधीक्षक एम. एस. पवार यांनी सांगितले.निवडणुकीत गुन्हेगारांचा त्रास वाढतो. हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने येथे गर्दी असते, यातून हाणामारीचे प्रकार घडतात. पोलिसांनी या सर्वांना ‘टार्गेट’ करून कारवाईचा धडाका लावला आहे. त्याचा अनुकूल परिणाम झाला आहे. पोलीसप्रमुख सावंत यांनीही जेथे तणाव निर्माण होऊ शकतो, अशा ठिकाणी जाऊन थेट लोकांशी संवाद साधण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात ते जत तालुक्यात जाऊन आले. निवडणुकीत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन तेथील लोकांना त्यांनी केले.