पोस्टात, पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने दोघांची ९ लाखांची फसवणूक; सांगलीतील सिक्युरिटी गार्डविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:06 IST2026-02-12T13:05:23+5:302026-02-12T13:06:08+5:30

चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका

Two people were cheated of Rs 9 lakhs by the post office with the promise of a job in the police force; Case registered against security guard in Sangli | पोस्टात, पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने दोघांची ९ लाखांची फसवणूक; सांगलीतील सिक्युरिटी गार्डविरुद्ध गुन्हा दाखल

पोस्टात, पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने दोघांची ९ लाखांची फसवणूक; सांगलीतील सिक्युरिटी गार्डविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : पोस्ट खात्यात नोकरीचे आमिष दाखवून शहरातील दोघांची एका भामट्याने तब्बल ९ लाख ८ हजार ७५ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सुनील मधुकर पाटील (वय ५३, रा. वसंतनगर, वरद इंपरिया, स्वाती गॅस एजन्सीजवळ, सांगली) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत कोंडिबा पवार (रा. गल्ली क्रमांक २, विद्यानगर, वारणाली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पवार आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारा सुनील पाटील यांची ओळख होती. श्रीकांत पवार यांचा मुलगा प्रज्वल यास पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपी सुनील पाटील याने पवार यांच्याकडून ४ लाख २१ हजार ६८५ रुपये उकळले. तसेच पवार यांचे मित्र राजकुमार गणपती खोत (रा. हिंदू मुस्लिम चौक, पाथरवट गल्ली, खणभाग, सांगली) यांना पोलिस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. 

त्याला बळी पडून खोत यांनी संशयित पाटील याला ४ लाख ८६ हजार ३९० दिले होते. दि. ८ डिसेंबर २०२२ ते २८ मार्च २०२५ यादरम्यान हा प्रकार घडला होता. पाटील याने दोघांकडून रक्कम घेतल्यानंतर नोकरी न लावल्याने दोघांनीही आरोपी पाटील याच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दिली.

चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका

सध्या सांगलीत पोलिस भरती सुरू असून या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टींना व अफवांना बळी पडू नका. मेरिटवरच पारदर्शकपणे भरती प्रक्रिया होत आहे. वरिष्ठ अधिकारी स्वत: जातीने या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title : सांगली: नौकरी के नाम पर सुरक्षा गार्ड ने दो लोगों को 9 लाख का चूना लगाया।

Web Summary : सांगली में एक सुरक्षा गार्ड पर डाक और पुलिस विभाग में नौकरी दिलाने का वादा करके दो लोगों से ₹9 लाख की धोखाधड़ी करने का आरोप है। मामला दर्ज।

Web Title : Sangli: Security guard dupes two of ₹9 lakh with job promises.

Web Summary : A Sangli security guard allegedly defrauded two individuals of ₹9 lakh by promising jobs in the postal and police departments. A case has been filed.