एकानं इस्लामपूरात अन् दुसऱ्यानं कोल्हापूर रस्त्यावरील लॉजवर नेऊन मुलीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 19:12 IST2021-12-22T19:09:33+5:302021-12-22T19:12:22+5:30

पोलिसांनी यातील दोन संशयितांना अटक केली आहे, तर मुख्य संशयितासह अन्य दोघे पसार झाले आहेत.

Two men have been arrested in Islampur for raping a minor girl | एकानं इस्लामपूरात अन् दुसऱ्यानं कोल्हापूर रस्त्यावरील लॉजवर नेऊन मुलीवर केला बलात्कार

एकानं इस्लामपूरात अन् दुसऱ्यानं कोल्हापूर रस्त्यावरील लॉजवर नेऊन मुलीवर केला बलात्कार

इस्लामपूर: इस्लामपूरमधील वाळवा तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. पोलिसांनी यातील दोन संशयितांना अटक केली आहे, तर मुख्य संशयितासह अन्य दोघे पसार झाले आहेत.

याबाबत पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बलात्काराचा आरोप असलेला मुख्य संशयित रोहन कुरणे, अनुष्का कांबळे, अरमान मुल्ला (तिघे रा. इस्लामपूर) हे पसार झाले आहेत. तर मुस्तफा हुसेन पठाण (वय २३), खालीद मुसा मुल्ला (वय २०, दोघे रा. शिवनगर, इस्लामपूर) यांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, कट रचणे आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद आहे.

दोन-तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी ही शिकण्यासाठी जात असताना दुपारच्या सुमारास रोहन कुरणे आणि मुस्तफा पठाण यांनी तिला रस्त्यात अडविले. तेथून पठाण हा भाड्याने राहत असलेल्या खोलीत तिला घेऊन गेला. यावेळी इतरांनी त्याला मदत करण्याची भूमिका घेतली. या खोलीत कुरणे याने पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

सदर घटनेनंतर १२ डिसेंबर रोजी साथीदारांच्या मदतीने अनुष्का कांबळे हिच्यासोबत दुचाकीवरून पीडित मुलीचे अपहरण केले. त्यानंतर कोल्हापूर रस्त्यावरील एका लॉजवर पुन्हा बलात्कार केला. हा प्रकार कोणास सांगितल्यास कुरणे याने संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या वडिलांना मोबाइलवरून धमक्या येऊ लागल्या. हा त्रास असह्य झाल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two men have been arrested in Islampur for raping a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.