तांदूळवाडी परिसरात दोन तास पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:13+5:302021-04-30T04:34:13+5:30

कुंडलवाडी (ता. वाळवा) येेथे जोराचा पाऊस पडल्याने नाल्यातील पाणी मुख्य रस्त्यावर वाहताना दिसत आहे. लोकमत न्यूज नेटवर्क तांदूळवाडी : ...

Two hours of rain in Tandulwadi area | तांदूळवाडी परिसरात दोन तास पावसाची हजेरी

तांदूळवाडी परिसरात दोन तास पावसाची हजेरी

कुंडलवाडी (ता. वाळवा) येेथे जोराचा पाऊस पडल्याने नाल्यातील पाणी मुख्य रस्त्यावर वाहताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात गुरुवारी जवळपास दोन तास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शेतातील मशागतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

तांदूळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी आदी गावे येत असून या गावांमध्ये गेले पाच दिवस झाले

मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी दुपारी चार वाजता पावसाने हजेरी लावली. या पावसासोबत ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि वारा यांच्यासोबत जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसाने गावातील नाले भरून रस्त्यावर पाणी वाहत होते. शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे मशागतीची कामे करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना कामे अर्धवट सोडून घरी परतावे लागले. हा पाऊस जवळजवळ दोन तास पडत होता.

Web Title: Two hours of rain in Tandulwadi area