शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अतिदक्षता विभागातच तंत्र मंत्राद्वारे रुग्णावर उपचाराचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:59 IST

या प्रकाराला डॉक्टरांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न

आटपाडी : आटपाडी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्र तंत्र म्हणत अवैधरीत्या जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला डॉक्टरांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.दरम्यान या प्रकाराबाबात संपतराव नामदेव धनवडे (वय ४३, रा.आटपाडी) यांनी आटपाडी पोलिसात निवेदन देत तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आटपाडी गावात बेकायदेशीर अंधश्रद्धा पसरवून धर्म परिवर्तन करण्याचे काम काही समाज विधायक व्यक्तीकडून जाणून-बुजून सुरू आहे. याबाबत काल, बुधवारचे (दि २१) वरद हॉस्पिटल आटपाडी येथील सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ प्राप्त झाले आहे. यात संबंधित व्यक्ती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून तंत्र मंत्राच्या आधारे भोंदूगिरी करताना दिसत आहे.याप्रकारास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता संबंधिताने हुज्जत घातली. सदर प्रकार करणारे आणि धर्मांतरण आपल्यावरील कृतीतून खतपाणी घालणारे आटपाडीतील संजय गेळे व त्यांच्या पत्नी अश्विनी गेळे या व्हिडिओ चित्रीकरणांमध्ये स्पष्ट दिसत आहेत. बेकायदेशीररित्या अंधश्रद्धा पसरवून व रुग्णांच्या असह्यतेचा गैरफायदा घेत धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या गेळे दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धनवडे यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल