शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

फलक फाडल्याने कोंगनोळीमध्ये तणाव

By admin | Updated: April 28, 2015 00:31 IST

कवठेमहांकाळ तालुक्यात पडसाद : बसवरील दगडफेकीत वाहनचालक जखमी; सर्वत्र निषेध

कवठेमहांकाळ : कोंगनोळी येथील मुख्य चौकामध्ये लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावरील महापुरुषाच्या प्रतिमेची अज्ञाताने विटंबना केल्यानंतर कोंगनोळीसह कवठेमहांकाळ शहरात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने कोंगनोळी येथे एसटी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनचालक जखमी झाला आहे. कवठेमहांकाळमध्ये काही वाहनांवर दगडफेक करून चौकामध्ये टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी शहर बंदची हाक दिली. त्यानंतर संपूर्ण शहर बंद ठेवण्यात आले. कार्यकर्त्यांनी दोन्ही ठिकाणी निषेध फेरी काढली. कोंगनोळी येथे मुख्य चौकात शुभेच्छा संदेश देणारे डिजिटल फलक लावण्यात आले होते. रविवारी रात्रीच्यावेळी अज्ञाताने महापुरुषाच्या डिजिटल फलकाची विटंबना केली. सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कोंगनोळीतील कार्यकर्ते एकत्रित झाले. त्याचवेळी सोशल मीडियावरून ही बातमी संपूर्ण तालुकाभर झाली.कोंगनोळी येथे जमावाने सलगरेकडून कवठेमहांकाळकडे येत असलेल्या एसटीवर दगडफेक केली. यामध्ये एसटीच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच एसटी चालक दगड लागल्यामुळे जखमी झाला. जमावाने रस्त्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त केला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी कोंगनोळीत येऊन शांततेचे आवाहन केले. त्याचबरोबर मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक युवराज मोहिते हेही घटनास्थळी हजर झाले. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी गावातून फेरी काढून शांततेचे आवाहन केले. घोरपडे यांच्याहस्ते गावात महापुरुषांच्या प्रतिमेचा नवीन डिजिटल फलक लावण्यात आला. निषेध फेरीमध्ये माजी राज्यमंत्री घोरपडे यांच्यासह नानासाहेब वाघमारे, पिंटू माने, शंकर माने, अरुण आठवले, परशराम पाटील, धनराज कांबळे, नितीन काटे, उत्तम काटे सहभागी झाले होते.कवठेमहांकाळ शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी कोंगनोळीकडे धाव घेतली. कवठेमहांकाळ येथील जुने एसटी स्थानक परिसरात कार्यकर्ते जमा झाले. लालासाहेब वाघमारे, प्रदीप चंदनशिवे, महावीर माने, सुधीर माने, प्रशांत चंदनशिवे, अमोल धेंडे, विजय साठे, सचिन वाघमारे, महेश माने, संभाजी भोसले, विजय साठे आदींनी शहरातून निषेध फेरी काढली. त्याचबरोबर शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली. त्यानुसार दिवसभर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. संतप्त जमावाने तहसील कार्यालयासमोरील चौकात टायर पेटवले. काही वाहनांवर जमावाने दगडफेक केली, तर काही वाहनांची तोडफोड केली. तहसील कार्यालयासमोरील चौकात काही वेळ रास्ता रोको करण्यात आला. तहसीलदार सचिन डोंगरे यांनी शहरातील मुख्य चौकात जाऊन जमावाला शांततेचे आवाहन केले. (वार्ताहर)कवठेमहांकाळ बंदची हाककोंगनोळीतील मुख्य चौकात शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावण्यात आले होते. रविवारी रात्री हा फलक अज्ञातांनी फाडून टाकलाया घटनेनंतर कोंगनोळीत तणाव निर्माण झाला. यावेळी जमावाने कवठेमहांकाळ-सलगरे या एसटी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत एसटी चालक ज्ञानू पाटील जखमी झालेया घटनेचे तालुकाभर पडसाद मटले. कवठेमहांकाळ येथे कार्यकर्त्यांनी शहर बंदची हाक दिली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला