शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:36 IST

दोघांशी गुप्त चर्चा : शिंदेसेनेशी युतीचा निर्णय लटकला

शितल पाटीलसांगली : महापालिकेच्या निवडणुकीत भाजप ३९ जागा जिंकत सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी स्पष्ट बहुमतासाठी एकाच जागेची कमतरता राहिली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून शिंदेसेनेच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील दोन नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्नही भाजपकडून केले जात आहेत.महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ३९ जागा जिंकत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला १६, राष्ट्रवादी (शरद पवार) ३ तर शिंदेसेनेला दोन जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी भाजपला एका जागेची गरज आहे. त्यासाठी शिंदेसेनेच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी त्यांनी चर्चा केली, तर मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून युतीबाबत ते सकारात्मक असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.शिंदेसेनेच्या पाठिंब्यावर सांगलीत भाजपचा महापौर होईल; पण स्थायी समिती सभापतीचा पेच मात्र फसला आहे. स्थायी समितीत संख्याबळानुसार भाजपला ८, काँग्रेसला ४, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला १ जागा मिळणार आहे. स्थायी समितीतही भाजप काठावरच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाही सोबत घ्यावे लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय मुंबईत होणार आहे.दरम्यान भाजपकडून आणखी दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटातील नगरसेवक युवराज गायकवाड व सुरेश बंडगर यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे दोन नगरसेवक भाजपसोबत आल्यास राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला वगळून भाजप महापौर व स्थायी समिती सभापतीपदावर वर्चस्व ठेवू शकते. या दोन्ही नगरसेवकांची भूमिका जयंत पाटील ठरवतील, असा स्पष्ट संकेत मिळाल्याने भाजपची रणनीती अडचणीत आली आहे.

सत्ता समीकरणे मुंबईतील नेतृत्वाकडे वळलीभाजपला आता राज्यातील सत्तेत असलेल्या आपल्या मित्रपक्षांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग भाजपसमोर उरलेला एकमेव पर्याय ठरत आहे. महापालिकेतील सत्ता समीकरणे आता मुंबईतील नेतृत्वाच्या निर्णयांकडे वळली असून, पुढील काही दिवसांत सत्तास्थापनेचा तिढा सुटणार की आणखी गुंतणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खास व्यक्तीवर जबाबदारीभाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील दोन नगरसेवकांशी चर्चेसाठी खास व्यक्तींवर जबाबदारी दिली आहे. यात एक आमदार समर्थक तर दुसरा व्यक्ती भाजप पदाधिकाऱ्याशी संबंधित आहे. या दोन्ही खास व्यक्तींनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी प्राथमिक चर्चाही केली; पण त्यांनी थेट आमदार जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखविल्याने भाजपच्या डावपेचांना अडथळा निर्माण झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Corporation power struggle: BJP courts Pawar's corporators.

Web Summary : BJP seeks power in Sangli, short of majority. Attempts are underway to secure support from Shinde's Sena and Pawar's NCP corporators. Decisions shift to Mumbai leadership.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे