शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात वाहतूक कोंडी आवाक्याबाहेर

By admin | Updated: April 28, 2015 00:21 IST

नगराध्यक्षच हतबल : विरोधी पक्षनेत्यांकडून राजीनाम्याची मागणी

अशोक पाटील- इस्लामपूर --इस्लामपूर शहरातील मुख्य चौका—चौकात वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. ही वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. विशेषत: रविवारी व गुरुवारी या आठवडी बाजारादिवशी अजिंक्य बझार, वाळवा बझारसमोरील रस्त्यावरच बाजारात येणारे व्यापारी, ग्राहक आपली वाहने लावतात. या वाहनांवर कोणीही कारवाई करत नाही. उलट व्यापारीच पालिका पदाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दम देतात. वाहतूक समस्येची जबाबदारी नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव घेत नाहीत. तसेच नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हात झटकून रिकामे होतात. या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी केली आहे.शहरातील वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करुन मांडलेल्या साहित्यामुळे चौका-चौकात वाहनांची मोठी गर्दी होत आहे. यावर उपाय म्हणून नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव यांनी पुढाकार घेऊन दोन बैठका घेतल्या. तरीसुध्दा वाहतुकीचे नियोजन झाले नाही. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही, ही जबाबदारी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचीही आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार द्यावेत, मग बघा माझ्या कामाची पध्दत, असे स्पष्ट करुन त्यांनी आपली जबाबदारी झटकली.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी तर, बघू, करतो, पाहू असे जुजबी उत्तर देत वाहतुकीचे नियोजन खंडेराव जाधव आणि नियोजन समितीतील सदस्यांवर आहे, असे स्पष्ट करीत स्मितहास्य करीत आपली जबाबदारी झटकली. सूर्यवंशी यांना नगराध्यक्षपद मिळाल्यापासून त्यांनी शहरातील नावाजण्यासारखे एकही काम केले नसल्याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.गुरुवारी आणि रविवारी या आठवडा बाजारादिवशी अजिंक्य बझार, वाळवा बझारसमोर जीवघेणी वाहतुकीची कोंडी होत असते. याठिकाणी दोन वाहतूक पोलीस नेमणुकीस असतात. परंतु त्यांच्याकडून येथील वाहनांची व्यवस्था लावणे शक्य होत नाही. रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांकडून नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी अवाच्या सवा भाडे बेकायदेशीरपणे उकळतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही.वाहतूक नियोजनासाठी बैठक घेऊ..!वाहतुकीसंबंधात पालिकेच्या सभागृहात दोन बैठका होऊनही, परिस्थिती जैसे थे आहे. नेहमीप्रमाणेच प्रत्येक महत्त्वाच्या चौकात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बनली आहे. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना विचारले असता, पुन्हा बैठका घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे जुजबी उत्तर देऊन त्यांनीही आपली जबाबदारी झटकली.वाहतूक नियोजन खर्चाला मंजुरी देण्यासाठी आम्ही विरोध केला होता. सभागृहाने मात्र त्याला मान्यता दिली. खर्च करुनही वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. यावर कोणतीही कडक कारवाई होत नाही. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि सभापती खंडेराव जाधव यांनी राजीनामे द्यावेत.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.