शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी तीन राष्ट्रवादी नगरसेवक भाजपकडे

By admin | Updated: September 13, 2015 00:18 IST

तासगाव नगरपालिकेतील राजकारण : नगराध्यक्षांविरोधात सोमवारी अविश्वास ठराव दाखल होणार

तासगाव : तासगाव नगरपालिकेत भाजपने सुरू केलेले धक्कातंत्र सलग दुसऱ्या दिवशीही कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या आणखी तीन नगरसेवकांसोबत खासदार संजयकाका पाटील यांच्याशी शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली. या नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यासाठी होकार दर्शविला आहे, तर नगरपालिकेत राष्ट्रवादीचा पुरता बोजवारा उडाला आहे. अविश्वास ठरावासाठी आवश्यक असणारी ‘मॅजिक फिगर’ मिळवण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तासगाव नगरपालिकेतील गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीअंतर्गत असलेली खदखद बाहेर पडली आहे. शुक्रवारी नगरसेविका सुशिला साळुंखे, विजया जामदार आणि रजनीगंधा लंगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची बातमी बाहेर पडली. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र या तीन नगरसेवकांनी प्रवेश करुनदेखील भाजपला नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आणखी दोन नगरसेवकांशी आवश्यकता होती. शुक्रवारी दिवसभर खासदार समर्थक नगरसेवकांनी खलबते केली. रात्री विसापूर येथे उपगराध्यक्ष सुरेश थोरात, अनुराधा पाटील आणि शुभांगी साळुंखे यांची खासदार संजय पाटील यांच्यासोबत गोपनीय बैठक झाली. या बैठकीत अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यासाठी सहमती दर्शवली असल्याची चर्चा आहे. नगराध्यक्षांविरोधात खासदार गटाने १५ मतांची गोळाबेरीज करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. (वार्ताहर)