शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन अल्पवयीन मुलींची सुटका

By admin | Updated: May 10, 2015 00:48 IST

सांगलीतील प्रेमनगरात छापा : दलाल महिलेस अटक

सांगली : येथील काळ्या खणीजवळील प्रेमनगरमधील वेश्या वस्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी रात्री छापा टाकून तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली. १४ ते १७ वयोगटातील या मुली आहेत. मुलींचा वेश्या व्यवसायासाठी वापर करणाऱ्या रूना कालामअली अन्सारी (वय ३२, रा. मुस्लिमपाडा, बाजबारीया, जिल्हा नोंदीया, राज्य पश्चिम बंगाल) या दलाल महिलेस अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्सारी सहा महिन्यांपासून प्रेमनगरमध्ये वास्तव्यास आहे. तिने पश्चिम बंगालमधील तीन अल्पवयीन मुलींना येथे वेश्या व्यवसायासाठी आणले असल्याची माहिती मिळाली होती. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस या वस्तीत जाऊन चौकशी करीत होते. त्यांना याठिकाणी मुली असल्याची खात्री पटताच शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात आला. मुलींना ताब्यात घेऊन अन्सारीला अटक केली. तिच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी दुपारी तिला न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मुलींना तिने खरेदी करून आणले आहे की, अपहरण करून याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मुली बालसुधारगृहात ताब्यात घेतलेल्या तीन मुलींनाही न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी मुलींची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये त्या अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलींच्या नातेवाइकांशी पोलीस संपर्क साधून त्यांच्या वयाचे दाखलेही मागविणार असल्याचे पोलीस निरीक्षक घनवट यांनी सांगितले.