शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संगणक वाहन परवान्यामुळे हजारो अनुत्तीर्ण

By admin | Updated: May 7, 2015 00:33 IST

जिल्ह्यातील स्थिती : वाहतूक नियमांचे अज्ञान; वर्षभरात ७३४१ परीक्षार्थी उत्तीर्ण

सांगली : वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) घेण्यासाठी संगणकावर परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली असली, तरी त्यास कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात संगणकावर परीक्षा देऊन केवळ ७३४१ उमेदवार वाहन चालविण्यास पात्र ठरले आहेत. वाहतूक नियमांविषयी अजूनही वाहनधारकांत अज्ञानपणा असल्याचे दिसून येते. यामुळेच अनुत्तीर्णांच्या प्रमाणात घट झालेली नाही. सध्या हे प्रमाण २७ टक्के असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सांगितले.पूर्वी मोटार वाहन निरीक्षकांकडून वाहतूक नियमांविषयी प्रश्न विचारले जायचे. ही तोंडी परीक्षा व्हायची. प्रत्येक वाहनधारक यात उत्तीर्ण व्हायचा. पुढे पक्के लायसन्स काढताना वाहनाची फेरी मारली की, लायसन्स काढण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची. यामध्ये यंत्रणेतील अनेक त्रुटी समोर आल्याने गेल्या दोन वर्षापासून लायसन्स काढण्याची जुनी पद्धत बंद करण्यात आली. कच्चे लायसन्स काढण्यासाठी प्रथम आॅनलाईन बुकिंग करण्याचा नियम करण्यात आला. तारीख मिळेल त्यादिवशी वाहनधारकाने जायचे. संगणकावर १५ गुणांची परीक्षा ठेवण्यात आली आहे. वाहतूक नियमांविषयी १५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला तीन पर्यायी उत्तरे दिलेली असतात. जे उत्तर बरोबर आहे, त्यावर केवळ अधोरेखित करायचे आहे. परीक्षा झाली की वाहनधारकास खुर्चीवरून उठण्यापूर्वीच तो उत्तीर्ण झाला आहे की अनुत्तीर्ण, हे समजते. ही अत्यंत व सोपी प्रक्रिया आहे.परीक्षेला एकावेळी १५ वाहनधारकांना बसण्याची सोय केली आहे. दररोज ५० ते ६० उमेदवार परीक्षेला येतात. यातील १३ ते १४ टक्के उमेदवार उत्तीर्ण होतात. कधी-कधी उत्तीर्णची ही टक्केवारी चार ते पाच टक्क्यावर येते. अनेकदा जेवढे उमेदवार दिवसभरात परीक्षेला बसले होते, ते सर्व अनुत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षभरात ९९९७ वाहनधारक परीक्षेला बसले होते. यातील ७३४१ उत्तीर्ण, तर २६५६ अनुत्तीर्ण झाले आहेत. वाहतूक नियम काय असतात, हे अनेकांना माहीतच नसल्याचे परीक्षेवेळी दिसून आले आहे. यामुळे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. (प्रतिनिधी)वाहने लाखावर... लायसन्स हजारोमहिन्याला तसेच सणासुदीला लाखो वाहने रस्त्यावर येतात. या वाहनांची नोंदणीही होते. मात्र वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी हे वाहनधारक का पुढे येत नाहीत. वर्षभरात ९९९७ जणांनी लायसन्ससाठी परीक्षा दिली; पण या तुलेनत लाखो वाहने रस्त्यावर आली आहे. वाहन विक्रीच्या तुलनेत लायसन्स काढण्याची लोकांमध्ये अजूनही मानकिसता दिसत नाही. पोलीस ज्यादिवशी नाकाबंदी करतात, त्यावेळी शंभरहून अधिक वाहनचालक लायसन्स नसणारे सापडतात.