शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांनी पक्षनिष्ठा मला शिकवू नये

By admin | Updated: August 14, 2015 00:06 IST

सुहास बाबर : बाबासाहेब मुळीक यांना टोला

विटा : नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, एवढेच नव्हे, तर गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही ज्यांनी पक्षाशी विसंगत भूमिका घेऊन काम केले, त्यांनी आम्हाला आता पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोला खानापूर पंचायत समितीचे उपसभापती सुहास बाबर यांनी राष्ट्रवादीचे खानापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला. लोकांच्या पाठबळावर मी पंचायत समितीला सर्वाधिक मतांनी विजयी झालो आहे. त्यामुळे उपसभापती पदाची खुर्ची मला जनतेने दिली आहे, मी खुर्चीला चिकटून राहिलो नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा सल्ला मला कोणी देऊ नये, असेही उपसभापती बाबर म्हणाले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुळीक यांनी बुधवारी पंचायत समितीत राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचे सांगून, उपसभापती बाबर हे राष्ट्रवादीचेच काम करीत आहेत, त्यामुळे पक्षाविरुध्द भूमिका घेण्यापूर्वी त्यांनी प्रथम राष्ट्रवादी कॉँग्रेसचा राजीनामा द्यावा, असा सल्ला दिला होता. त्यावर गुरुवारी उपसभापती बाबर म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जात नाहीत. त्यामुळे मी पक्षाचा उल्लेख केला नव्हता. परंतु, तालुक्यातील १३ पैकी १० ग्रामपंचायतीत आ. अनिल बाबर समर्थकांचे सरपंच व उपसरपंच आहेत. प्रसारमाध्यमांनीही ही वस्तुस्थिती समोर आणली होती. आम्ही गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत नव्हतो. तरीही आम्हाला जनाधार मिळाला. लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतले, ते गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे जनतेच्या दरबारात दिशाभूल करणारा युक्तिवाद चालत नाही. त्यासाठी जनतेची मने जिंकावी लागतात. अनेक निवडणुकांत ज्यांनी पक्षांशी विसंगत भूमिका घेऊन काम केले, त्यांच्या तोंडी पक्षनिष्ठा, पक्षशिस्त, पक्षादेश असे शब्द शोभत नाहीत. त्यामुळे आम्हाला कोणी पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोलाही बाबर यांनी लगावला. (वार्ताहर)सर्वांना विश्वासात घेतोखानापूर पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात आम्ही सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करतो. सर्व कार्यक्रमांचे निमंत्रण जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना देत असतो. ते कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार लोकाभिमुख व सर्वांना विश्वासात घेऊन केला जात असल्याचेही बाबर यांनी यावेळी सांगितले.