शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गाईच्या दुधाचे दर घसरले, पशुखाद्याचे दर वाढले; पशुपालक आर्थिक अडचणीत 

By अशोक डोंबाळे | Updated: January 10, 2024 12:08 IST

अशोक डोंबाळे सांगली : गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध ...

अशोक डोंबाळे

सांगली : गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने, दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पशुखाद्याच्या दरात ५० किलो पोत्याला १०० ते १५० रुपये वाढले असून, गायीच्या दुधाचे दर प्रति लीटर ५ ते ६ रुपयांनी उतरले आहेत.

ग्रामीण भागात शेतीपुरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. दुभत्या गाईच्या माध्यमातून शेतीला मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. ज्या शेतकऱ्यांकडे घरचा चारा उपलब्ध आहे, त्यांना दुग्ध व्यवसाय परवडतो. मात्र, विकत घेऊन जनावरांना चारा घालणे परवडणारे नाही, पशुखाद्याच्या दरात वाढ व दूध दर कमी, अशा विचित्र परिस्थितीमुळे दुग्ध व्यवसाय तोट्याचा ठरू पाहत आहे.

जानेवारी, २०२३ मध्ये गोळी पेंढीचा दर ५० किलोच्या पोत्यास १,५५० रुपये दर होता. यामध्ये १५० रुपयांची वाढ होऊन प्रति पोते १,७०० रुपये दर झाला आहे. शहराजवळील मोठे दुग्ध व्यावसायिक आणि दूध डेअरी चालकांना १,६२० रुपयांना पेंढीचे पोते मिळत आहे. शेंग पेंडीला जानेवारी, २०२३ मध्ये प्रति पोते २,८०० ते २,९०० रुपयांना शेतकऱ्यांना मिळत होते. सध्या पोत्याचा ४०० ते ३०० रुपये दर वाढला आहे. खाद्याच्या किमती वाढल्याने जादा किमतीत खाद्य खरेदी करावे लागत आहे. दुधाचे दर ५ ते ६ रुपयांनी घसरले आहेत. एकूण परिस्थिती पाहता दुग्ध व्यवसाय अडचणीत असून, यातून शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे आहे.

छोटे पशुपालक तोट्यात

गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर लीटरमागे ५ ते ६ रुपयांनी घसरले असून, यापूर्वी प्रति लीटर ३३ ते ३५ रुपये दर मिळत होता, तो आता २८ ते २९ रुपये लिटर मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना ८ ते १० दुभती जनावर आहेत, त्यांना थोडे फार उत्पन्न मिळते. मात्र, ज्यांच्याकडे एक किंवा दोन जनावरे आहेत, त्यांच्यासाठी हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे.

पशुखाद्याचे ५० किलो पोत्याचे दर

पेंढीचा प्रकार - जानेवारी २०२३ - जानेवारी २०२४
गोळी पेंढ - १,५५० - १,६२० ते १,७००
शेंग पेंड - २,८५० - ३,२००
भुसा - १,१७० - १,३५०
मका भरडा - १,२५० - १,४००
सरकी पेंढ (४० किलो) - १,२०० - १,२५०

अनुदानात शेतकऱ्यांची फसवणूकच : उमेश देशमुख

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत गाईच्या दुधाला ३.२ फॅटला प्रति लीटर २९ रुपये दूध संघांनी दर द्यावा, अधिक ५ रुपये शासन अनुदान असे ३३ रुपये दर निश्चित झाला होता, पण शासन आदेशात ३.५ फॅटला २७ रुपये दूध संघ चालकांनी द्यावेत. अधिकचे ५ रुपये शासन अनुदानाचा निर्णय झाला आहे. शासनाने फॅट ०.३ ने वाढविली असून, दरही कमी केला आहे. यामुळे अनुदानामध्ये शेतकऱ्यांची शासनाने फसवणूकच केली आहे, असा आरोप किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केला आहे.

टॅग्स :Sangliसांगली