शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महापौरपद खुले; इच्छुकांची संख्या मोठी, नेत्यांची डोकेदुखी वाढली; कुणाची नावे चर्चेत..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:57 IST

महापौरपदासाठी भाजप अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे

सांगली : सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेचे महापौरपद यंदा सर्वसाधारण झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडून धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, रोहिणी पाटील आणि संतोष पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत. स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नसल्याने सत्तेसाठीही गोची झाल्याचे चित्र आहे.महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे संख्याबळ ३९ आहे. भाजपला बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे. काँग्रेसचे १८, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला १६, राष्ट्रवादी (शरद पवार) ३ तर शिंदेसेनेला २ जागा मिळाल्या. भाजपने सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेनेशी चर्चा सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांना फोनही केला होता. पण युतीचा निर्णय मुंबईत होणार आहे. दुसरीकडे स्थायी समिती सभापतिपदाचा पेच वाढला आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला सोबत घ्यावे लागणार आहे. दरम्यान, भाजपने राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या दोन नगरसेवकांशी संपर्क साधला आहे. अजित पवार गटाशी युती केल्यास संख्याबळानुसार महापालिकेतील सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. उलट शरद पवार गटाशी समझोता भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.गुरुवारी मुंबईत मंत्रालयात महापौरपदासाठी आरक्षण सोडत झाली. महापौरपद खुले झाल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी, सलग तीनदा निवडून आलेल्या रोहिणी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी इच्छुकांची संख्या वाढणार असल्याने महापौर निवडीत नेत्यांची कसरत होणार आहे.

सूर्यवंशी की आवटी?गत सत्ताकाळात भाजपने धीरज सूर्यवंशी यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती. तेव्हा राज्यात महाआघाडीचे सरकार होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील होते. राष्ट्रवादीने भाजपविरोधात मोर्चेबांधणी करून सात नगरसेवकांना फोडले होते. त्यामुळे अटीतटीच्या लढती सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता. सूर्यवंशी यांच्यासह निरंजन आवटी हेही इच्छुक होते. पण नेत्यांनी आवटी यांची समजूत काढून सूर्यवंशींना महापौरपदाच्या मैदानात उतरविले होते. आता महापौरपदासाठी सूर्यवंशी व आवटी हे दोघेही प्रमुख दावेदार राहणार आहेत. त्यापैकी कुणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.

रोहिणी पाटील यांचे नाव चर्चेततिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या रोहिणी पाटील यांचे नावही महापौरपदाच्या शर्यतीत आहे. रोहिणी पाटील या भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या भगिनी आहेत. तसेच कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांच्या चुलत भगिनी आहेत. त्यामुळे पाटील यांच्यासाठी महाडिक कुटुंबीयाकडून मुख्यमंत्र्यासह पक्षश्रेष्ठीकडे आग्रह धरला जाऊ शकतो.

पक्षांतर्गत संघर्ष तीव्रमहापौरपदासाठी भाजप अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे असून, पक्षामधील गटबाजी उघडपणे समोर येण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या आणि समीकरणे पाहता, निर्णय प्रक्रिया कठीण ठरणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत संघर्ष निर्माण झाला होता. पण तो जाहीर व्यासपीठावर आणण्याचे भाजपने टाळले होते. तरीही प्रचारात गटबाजी दिसून येत होती. या पार्श्वभूमीवर भाजपमधील मतभेद मिटवण्यासाठी आणि सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Mayor Post Open; Many Aspirants, Leaders' Headache Increases

Web Summary : Sangli's mayor post is now open, sparking political activity. BJP faces internal competition with multiple candidates. Factions may surface amid power struggles. Key names in discussion include Dheeraj Suryavanshi, Niranjan Awati, Rohini Patil, and Santosh Patil. Coalition talks are ongoing for majority.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६MayorमहापौरBJPभाजपा