कुरळप परिसरातील चोरीतील दहा लाखांची जनावरे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:24+5:302021-08-27T04:29:24+5:30

वारणा काठावरील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना पशुपालनाच्या व्यवसायातून मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांकडे ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतची दुभती ...

Tens of millions of stolen animals returned from Kurlap area | कुरळप परिसरातील चोरीतील दहा लाखांची जनावरे परत

कुरळप परिसरातील चोरीतील दहा लाखांची जनावरे परत

वारणा काठावरील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना पशुपालनाच्या व्यवसायातून मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांकडे ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतची दुभती जनावरे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी घरापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर शेतातच जनावरांचा गोठा केला आहे. यामुळे रात्रीच्यावेळी या ठिकाणी कोणीही नसते. याचा फायदा घेत गत काही महिन्यांमध्ये चोरट्यांनी जनावरांची चोरी केली होती. या चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे वारंवार मागणी होत होती. याची दखल घेत सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी कार्यवाही सुरू केली.

पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त ठेवली होती. यादरम्यान १९ जुलैरोजी समीर लाला दरवेशी (वय २२), गजेंद्र यशवंत लांडगे (३७, दोन्ही रा. हंगिरगे, ता. सांगोला, जि. सोलापूर) व रहीम दस्तगीर दरवेशी (२५, रा. पाडळी, ता. हातकणंगले) हे तिघे जनावरे घेऊन जात असताना निदर्शनास आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते जनावरांची चोरी करत असल्याचे समोर आले.

कोट

शेतकऱ्यांना त्यांचे पशुधन मिळवून देण्यासाठी आमचे सर्व कर्मचारी, पोलीसपाटील व ग्रामस्थांनी सहकार्य केले. यामुळेच बळीराजाला न्याय देता आला.

- दीपक जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, कुरळप पोलीस ठाणे.

Web Title: Tens of millions of stolen animals returned from Kurlap area