शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, अडीच हजार नागरिकांना मार्ग कोणता?

By admin | Updated: August 6, 2016 23:58 IST

सावरखेडला जाणाऱ्या पेढी नदीवरील पूल वजा बंधाऱ्याचा मार्ग लघु पाटबंधारे विभागाच्या निष्कर्षाअंती जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्याचे निर्देश दिलेत.

शिराळा : जिवंत नागांची पूजा करणाऱ्या शिराळकरांना नाग पकडण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे नागपूजा करायला वारूळ शोधायची वेळ आली आहे. नागपंचमीला स्वागत फलक, कमानींनी झगमगणाऱ्या शिराळा शहरात यावर्षी मात्र काळ्या झेंडे लागणार आहेत. जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या शिराळकरांकडून आज (रविवारी) नागपंचमीचे काळ्या झेंड्यांनी स्वागत होत आहे.हजारो वर्षांपूर्वी गोरक्षनाथांनी शिराळा येथे महाजनांच्या घरी जिवंत नागाच्या पूजेला सुरुवात केली. ही परंपरा आणि त्याचे पावित्र्य राखत हा सण साजरा केला जात होता. मात्र २००२ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आणि शिराळकरांच्या नागपंचमीला उतरती कळा लागली. २०१४ पर्यंत घराघरात आणि अंबामाता मंदिरात जिवंत नागाची पूजा केली गेली, मात्र २०१५ ला अंतिम आदेशाने नाग पकडण्यासही बंदी घातल्याने जिवंत नागपूजा थांबवण्यात आली.उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतरही शिराळकरांनी नागपूजेला परवानगी मिळेल, या अपेक्षेने अनेक बंधने घालून घेतली. छायाचित्रण व्यवसाय पूर्ण बंद करण्यात आला. बिनविषारी सर्प पकडणे बंद झाले. मात्र शिराळकरांचा भ्रमनिरास झाला. न्यायालयाने अंतिम आदेशाद्वारे नाग पकडण्यासही बंदी घातली.हजारो वर्षांची परंपरा बंद पडली. पूर्ण नागपूजेस बंदी असल्याने शिराळकरांनी आता निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जात, धर्म, पक्ष, गट यास बाजूला सारून सर्व शिराळकर एकवटले आहेत. शिवाय यावर्षी नागपंचमी दिवशी सर्व गावकरी घरावर काळे झेंडे लावणार आहेत. त्याचबरोबर स्वागत कमानी, फलक न लावता सर्व गावात काळे झेंडे आणि काळ्या गुढ्या उभारण्यात येणार आहेत. स्वागत कमानी आणि फलकांऐवजी काळे झेंडे आणि प्रत्येक ठिकाणी बहिष्काराचे फलक लावले गेले आहेत. ‘ये लढाई आर पार है, अंतिम यह प्रहार है’असे फलक संपूर्ण शहरात झळकत आहेत. (वार्ताहर)स्वागत कमानींऐवजी काळ्या गुढ्यानागपंचमीसाठी शिराळा शहर सज्ज झाले आहे. मात्र स्वागत कमानींऐवजी काळे झेंडे, काळ्या गुढ्या, निवडणुकीवर बहिष्कार, तसेच शासनाच्या निषेधाच्या फलकांचीच गर्दी दिसत आहे. प्रशासनाला सहकार्य करीत न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नागपंचमी साजरी करण्याचा निर्णय घेतला असला तरी शिराळकरांची नाराजी स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, शनिवारी पोलिसांनी शहरातून संचलन केले, तसेच वनविभागाच्या वतीने प्रबोधन रॅली काढण्यात आली.