भूमी अभिलेख अपिलांसाठी सांगलीत शिबिर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:43+5:302021-09-03T04:26:43+5:30

फोटो ओळ : सांगली बार असोसिएशनच्यावतीने वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व ॲड. अमोल चिमाण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री ...

Take a camp in Sangli for land records appeals | भूमी अभिलेख अपिलांसाठी सांगलीत शिबिर घ्या

भूमी अभिलेख अपिलांसाठी सांगलीत शिबिर घ्या

फोटो ओळ : सांगली बार असोसिएशनच्यावतीने वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व ॲड. अमोल चिमाण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना हे निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : पुणे येथील उपसंचालक भूमी अभिलेख व अप्पर आयुक्त यांचा अपील कामी चालणारा कॅम्प सांगली येथे व्हावा, अशी मागणी सांगली बार असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. असोसिएशनच्यावतीने वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व ॲड. अमोल चिमाण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना हे निवेदन दिले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बार असोसिएशनला कॅम्प लवकरात लवकर चालू करण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी ॲड. अमोल चिमाण्णा म्हणाले की, अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालावर व जिल्हा भूमिअभिलेख (पुणे) यांच्या निकालावर उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे व अप्पर आयुक्त, पुणे यांच्याकडे अपील चालते. आता सांगलीत या केसेस चालवाव्यात. जेणेकरून लोकांचे हेलपाटे थांबतील. यावेळी ॲड. प्रमोद भोकरे, ॲड. प्रमोद सुतार, ॲड. किरण राजपूत, संदीप लवटे, ॲड. प्रमोद कटाने, ॲड. शीतल मदवाने, ॲड. शिवाजीराव साळुंखे, ॲड. प्रकाश लोखंडे, जहांगीर जमखंडीकर प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Take a camp in Sangli for land records appeals