शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Jaisingrao Pawar passes away: तडसरचा इतिहासदीप अखेर मालवला; गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:41 IST

पवारांचा इतिहास दृष्टिकोन जपणे हीच त्यांना आदरांजली

प्रताप महाडिक

कडेगाव : तडसरच्या मातीतून उगवलेला एक तेजस्वी इतिहासदीप आज कायमचा मावळला… आणि त्या प्रकाशाच्या विरहाने संपूर्ण गाव अश्रूंनी दाटून आले. प्रज्ञावंत इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या निधनाने तडसर गावावर शोककळा पसरली असून, ही केवळ एका व्यक्तीची हानी नसून एका विचारप्रवाहाचा, एका युगाचा अंत असल्याची भावना ग्रामस्थांच्या मनात दाटून आली आहे.

जयसिंगराव पवार हे नाव म्हणजे केवळ इतिहास अभ्यासक नव्हे, तर इतिहास जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती. तडसर ही त्यांची जन्मभूमीच नव्हे, तर त्यांच्या विचारांची पाळणाघर होती. इथल्या शाळेच्या ओसरीवरून सुरू झालेला त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या इतिहासाच्या गाभ्यापर्यंत पोहोचला; पण त्या प्रवासात त्यांनी कधीही आपल्या मातीतली नाळ तुटू दिली नाही. २३ सप्टेंबर २०१९ चा दिवस आजही गावकऱ्यांच्या स्मरणात जिवंत आहे. 

रयत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी विद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी ते गावात आले होते. त्या भेटीत त्यांच्या डोळ्यांत दाटलेले बालपण, ग्रामस्थांशी साधलेले आत्मीय संवाद, आणि मातीतल्या माणसांबद्दलचा जिव्हाळा आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. तोच इतिहासपुरुष आज कायमचा निघून गेल्याची जाणीव गावाला अस्वस्थ करून जाते. तडसरच्या वैभवात मोलाची भर घालणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 

अरविंद इनामदार यांच्यासारख्या मान्यवरांसोबत जयसिंगराव पवार यांनीही गावाचे नाव अभिमानाने उंचावले. त्यांच्या संशोधनातून महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलू उजेडात आले. परंतु या सर्व यशामागे उभी होती ती तडसरच्या संस्कारांची समृद्ध परंपरा ही जाणीव गावकऱ्यांना नेहमीच अभिमानाने भरून टाकते.

पवारांचा इतिहास दृष्टिकोन जपणे हीच त्यांना आदरांजली

तडसरमध्ये शोकसभा, श्रद्धांजलीचे कार्यक्रम होतील; पण खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली देण्याचा मार्ग एकच तो म्हणजे त्यांनी दाखवलेला इतिहास दृष्टिकोन जपणे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत नव्या पिढीने संशोधनाची मशाल पुढे नेली, तरच हा इतिहासपुरुष खऱ्या अर्थाने जिवंत राहील. तडसरची माती आज अश्रूंनी ओलावलेली आहे. पण, त्याचवेळी त्या मातीतून उगवलेल्या इतिहासदीपाच्या प्रकाशाने ती सदैव उजळलेलीही राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Historian Jaisingrao Pawar Passes Away, Tadsar Mourns Loss

Web Summary : Historian Jaisingrao Pawar, a native of Tadsar, passed away, plunging the village into mourning. His historical insights and connection to his roots deeply impacted the community, leaving a legacy of historical awareness and inspiration for future generations. He was known for his significant contributions to Maharashtra's history.