शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘स्वाइन’चे तीन बळी?

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

मृतांत दोन महिला : एकाच दिवशी तिघांच्या मृत्यूने भीतीचे वातावरण

सांगली : ‘स्वाइन फ्लू’ संशयित आणखी तीन रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. एका दिवसात तिघांचा बळी गेल्याचा हा पहिलाच प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयात डॉक्टरांसह रुग्णांचे नातेवाईक आता तोंडाला मास्क लावून फिरू लागले आहेत. सुजाता अशोक जोशी (वय ४८, रा. सीतारामनगर, सांगली), निर्मला अशोक पाटील (५०, पद्मावती कॉलनी, धामणी रस्ता, सांगली) व प्रतापसिंह बाळासाहेब पाटील (२९, वारणाली, विश्रामबाग) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांना गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे सुजाता जोशी व निर्मला पाटील यांना शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते; पण तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. प्रतापसिंह पाटील यांना शनिवारी दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू केल्यानंतर दोन तासांतच त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांच्याही रक्ताचे नमुने घेऊन तपासणीला पाठविण्यात आले होते. गेल्या आठवड्याभरात स्वाइन संशयित सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन रुग्णांच्या तपासणीच्या अहवालात त्यांना स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. हे रुग्ण दानोळी (ता. शिरोळ) व वायफळे (ता. तासगाव) येथील होते. सध्या रुग्णालयात स्वाइनची लागण झालेले तीन रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी) वर्षभरात १८ बळी गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूचे ६८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ रुग्णांचा बळी गेला आहे. उर्वरित ५० रुग्ण उपचार होऊन बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. महिन्यापासून स्वाइन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कडक ऊन असतानाही या आजाराचा झपाट्याने फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.