विद्यार्थ्याना संघर्ष शिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:41+5:302021-09-03T04:26:41+5:30

फोटो ओळ : जत येथे युथ फॉर जत संस्थेच्या कार्यालय उद्घाटनावेळी डॉ. नानासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. ...

Students have no choice but to struggle | विद्यार्थ्याना संघर्ष शिवाय पर्याय नाही

विद्यार्थ्याना संघर्ष शिवाय पर्याय नाही

फोटो ओळ : जत येथे युथ फॉर जत संस्थेच्या कार्यालय उद्घाटनावेळी डॉ. नानासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. विक्रम सावंत, डॉ. मदन बोर्गिकर, डॉ. सुनील जोशी, डॉ. गजानन रेपाळ, डॉ. मनोहर मोदी, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : जगात ज्या व्यक्तीनी मोठे नाव कमावले आहे; त्यासाठी त्यांना संघर्षही तितकाच मोठा करावा लागतो. आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता सतत संघर्ष करत राहा. एक ना एक दिवस तुमच्या कष्टाला फळ येईल, असे प्रतिपादन ऑक्स्फर्ड विद्यापिठातील वरीष्ठ संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी केले.

युथ फॉर जत या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.

नानासाहेब थोरात म्हणाले, जगातल्या शंभर उत्क्रुष्ठ विद्यापिठा मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तंत्रज्ञानाने जगणे सुकर होत असले तरी या तंत्रज्ञानाचे संशोधन भारतात होणे गरजेचे आहे. यासाठी शासन व्यवस्थेनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे.

आ. विक्रम सावंत म्हणाले, युथ फॉर जत संस्थेला शासकीय स्तरावरुन सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. आमदार फंडातून ७ लाख रुपयांची विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणि विक्रम फौंडेशनच्या वतीने फर्निचर देण्याचे त्यांनी जाहीर केले.

डॉ. संजय लठ्ठे, दिलीप वाघमारे, बुध्दिबळपटू श्रेया हिप्परगी, प्रतीक्षा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मदन बोर्गिकर, डॉ. सुनील जोशी, डॉ. गजानन रेपाळ, डॉ. मनोहर मोदी, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, डॉ. कैलास सनमडीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, दिनेश शिंदे, प्रदीप साळुंखे उपस्थित होते. भुपेंद्र बाबासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव अमित बामणे यांनी आभार मानले.

Web Title: Students have no choice but to struggle