शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकाेर पालन करा : जितेंद्र शहाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:27 IST

ढालगाव : लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कवठेमहांकाळ ...

ढालगाव : लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केले.

ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे ग्रामस्थांना मार्गदर्शनप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी शहाणे व सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांचा सत्कार सरपंच प्रतिनिधी जनार्दन देसाई, उपसरपंच माधवराव देसाई, जिल्हा परिषद सदस्य भगवान वाघमारे, भाऊसाहेब पाटील, कुमार पाटील, विजय घागरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शहाणे म्हणाले की, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करा, मास्कचा वापर करा, अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद करा; शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा पूर्णपणे बंद राहतील, ग्रामस्थांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, विनाकारण रस्त्यावर फिरू नये: पंचेचाळीस वय पूर्ण असलेल्या नागरिक व व्यापारी कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

यावेळी पोलीस पाटील माणिक पाटील, कुमार पाटील, व्यापारी संघटना अध्यक्ष सुभाष खांडेकर, पोपट धोकटे, श्रीशैल्य शेटे, विजय घागरे, दिलावर मणेर, सलीम फकीर, हरी घोदे, आण्णा हातेकर, माणिक देसाई, ग्रामसेवक डी. एस. जोशी, तलाठी कपिल सयाम व ग्रामस्थ उपस्थित होते.