शिराळा शहरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:35+5:302021-04-11T04:25:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी पहिल्याच दिवशी कडकडीत वीकेंड लाॅकडाऊन पाळण्यात आला. किराणा दुकाने बंद हाेती. ...

Strictly closed in Shirala city | शिराळा शहरात कडकडीत बंद

शिराळा शहरात कडकडीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी पहिल्याच दिवशी कडकडीत वीकेंड लाॅकडाऊन पाळण्यात आला. किराणा दुकाने बंद हाेती. प्रवासी नसल्याने अत्यावश्यक सेवा असूनही बससेवा बंद होती. औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद होते. ऑनलाईन व्यावसायिक मात्र दुचाकीवरून आपली सेवा पुरवित हाेते.

तालुक्यात सर्व गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यात येत होती.

वाहनांची तपासणी करण्यात येत होती.

तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल आदींनी पहाणी केली.

शिराळा शहरातील सर्व व्यवसाय पूर्ण बंद होते. सोमवार पेठ, कुरणे गल्ली, लक्ष्मी चौक, एस. टी. स्टॅंड परिसरात शुकशुकाट होता. शेडगेवाडी, आरळा, कोकरूड, चरण, मांगले, सांगाव, चिखली, शिरशी, वाकुर्डे आदी सर्व गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार १०० टक्के बंद होते.

Web Title: Strictly closed in Shirala city