शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात रुग्णालयाचे काम सुरू

By admin | Updated: November 18, 2016 23:41 IST

मानसिंगराव नाईक : पन्नास खाटांचे रुग्णालय उभारणार; १५ कोटी मंजूर

शिराळा : येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीच्यादृष्टीने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने वैद्यकीय उपचाराची मोठी सोय होणार असल्याची माहिती माजी आमदार मानसिंंगराव नाईक यांनी दिली. शिराळा येथे जुन्या शासकीय रुग्णालयाची इमारती पाडून उपजिल्हा रुग्णालय उभारणीच्या दृष्टीने सुरू झालेल्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण, डोंगराळ व अति मागास तालुक्याचा विचार करून शिराळा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याबाबत मी लोकप्रतिनिधी असताना प्रयत्न केले. येथील भौगोलिक परिस्थिती, जनतेची मागणी व गरज लक्षात घेऊन आघाडी शासनाने येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास १७ जानेवारी २०१३ ला मंजुरी दिली होती. १३ मार्च २०१५ रोजी झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत रुग्णालय बांधकामाच्या १४.७६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्याचे राजपत्र सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने ३ जून २०१५ रोजी जाहीर केले होते. आता प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला आहे. या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीनंतर आरोग्यासाठी आवश्यक तातडीच्या व प्रगत सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध होतील. सांगली, कोल्हापूर, कऱ्हाडकडे जाऊन खासगी रुग्णालयात घेतल्या जाणाऱ्या खर्चिक उपचाराच्या जोखडातून मुक्ती मिळून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी समाजाची गरज ओळखून दोन वर्षापूर्वी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. शिराळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. यावेळी तालुक्याचे माजी सभापती अ‍ॅड. भगतसिंंग नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, ‘विश्वास’चे संचालक भीमराव गायकवाड व विश्वास कदम, शिराळ्याचे माजी सरपंच गजानन सोनटेव देवेंद्र पाटील, माजी उपसरपंच संभाजी गायकवाड, सुनील कवठेकर व बाबा कदम, के. वाय. मुल्ला, गौतम पोटे, पंचायत समितीचे सदस्य लालासाहेब तांबीट यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)