शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result: मेंढ्या चारुन 10 वीत 92 % मिळवले, पडळकरांनी पठ्ठ्याचं कौतुक केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:38 IST

राज्यात कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली. तर, पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे

सांगली - राज्यातील इयत्ता 10 वीचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यानंतर, अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून आले. पालक, विद्यार्थी तसेच शिक्षक एकमेकांचे अभिनंदनही करताना दिसत आहेत. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला. त्यात, कित्येकांनी परिस्थितीशी दोनहात करत यश मिळवले आहे. कुणी काम करुन स्वत:चं शिक्षण पूर्ण केलंय. तर, कुण्या रिक्षावाल्याच्या पोरानं 90 टक्क्यांची भरारी घेतलीय. काहींनी  वयाचं बंधन न झुगारत 10 वीची परीक्षा पास केलीय. सांगलीतील एका मेंढपाळपुत्रानेही असंच यश कमावलंय.  

राज्यात कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली. तर, पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे. सगळीकडे ८०-९० टक्क्यांची चर्चा होत असताना पुण्यातील एका पट्ठ्याने सर्वच विषयात ३५ गुण मिळवले आहेत. तर, वडिल हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात तर आई घरकाम करते. अशा परिस्थितीतून धायरीतील पायलकुमारीने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे सांगलीत एका मेंढपाळाच्या मुलाने मेंढ्या चारुन अभ्यास करत ९२ टक्के गुण मिळवले.  

शाळेसाठी शेंडगेवाडी ते कामथ रोजचा ५ किमीचा खडकांनी भरलेला प्रवास. त्यानंतर मेंढ्या चारण्यात बापाला मदत करायची, अभ्यास करायचा. अशा संघर्षातून हेमंत बीरा मुढे या मेंढपाळ पुत्रानं दहावीला ९२ टक्के मिळवले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुलाचं ट्विट करुन कौतुक केलंय. तसेच, ''तुझ्या कपाळी भंडारा राहू दे, बा बिरोबाचं बळ तुझ्या आयुष्यात नक्की सोबत राहिल.'', असेही पडळकर यांनी या यशस्वी विद्यार्थ्याबाबत म्हटलं आहे.

दरम्यान, दहावीच्या निकालात अनेक गरीब आणि आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियातूनही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.  

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSangliसांगली