शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना क्रीडा प्रोत्साहनात्मक अनुदान

By admin | Updated: July 23, 2015 00:13 IST

‘शांतिनिकेतन’ची बाजी : नऊ लाखांचे अनुदान

सांगली : क्रीडा संचालनालयातर्फे शाळांना दिले जाणारे क्रीडा प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर झाले आहे. सांगलीतील पाच शाळांचा यामध्ये समावेश आहे. शांतिनिकेतन विद्यामंदिर ही शाळा यामध्ये आघाडीवर आहे. एकूण नऊ लाखांचे अनुदान जिल्ह्याच्या क्रीडा खात्यात जमा होईल. येथील सांगली हायस्कूलमध्ये महापालिका शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांची नावे क्रीडाधिकारी कार्यालयाने जाहीर केली. शासन परिपत्रकानुसार जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या शाळांना अनुक्रमे दहा, सात व पाच असे गुण दिले जातात. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांतून एक ते तीन क्रमांक काढले जातात. विजेत्या शाळांना पुढीलप्रमाणे क्रीडा प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते : प्रथम : एक लाख, द्वितीय : पंच्याहत्तर हजार, तृतीय : पन्नास हजार. अनुदान जाहीर झालेल्या शाळा : २०१३-१४ : चौदा वर्षे गट : आप्पासाहेब बिरनाळे स्कूल (प्रथम), शांतिनिकेतन विद्यामंदिर (द्वितीय), नवकृष्णा व्हॅली स्कूल (तृतीय). सतरा वर्षे गट : शांतिनिकेतन विद्यामंदिर (प्रथम), नवकृष्णा व्हॅली स्कूल (द्वितीय), आप्पासाहेब बिरनाळे स्कूल (तृतीय). २०१४-१५ : चौदा वर्षे गट : शांतिनिकेतन विद्यामंदिर (प्रथम), आप्पासाहेब बिरनाळे स्कूल (द्वितीय), किर्लोस्कर हायस्कूल (तृतीय). सतरा वर्षे गट : शांतिनिकेतन विद्यामंदिर (प्रथम), आप्पासाहेब बिरनाळे स्कूल (द्वितीय), विद्यामंदिर प्रशाला (तृतीय). शासनाकडून अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान वितरित करण्यात येईल, अशी माहिती क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी दिली.तर शाळांवर कारवाई...प्रत्येक शाळेला शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेतील किमान दोन सांघिक व तीन वैयक्तिक खेळ प्रकारांत सहभागी होणे शासन परिपत्रकानुसार बंधनकारक आहे. ज्या शाळा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांच्यावर यंदाच्या वर्षी कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी दिला.