शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बेभरवशाच्या अनुदानावर खर्चाची सर्कस

By admin | Updated: August 9, 2015 00:47 IST

महापालिकेची स्थिती : शासनाकडून अनुदान वाटपाच्या नियोजनाची आवश्यकता; घरपट्टी, पाणीपट्टीला मर्यादा

सांगली : महापालिकेच्या डोक्यावर सध्या आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत. साडेसात कोटीचे अनुदान देणाऱ्या राज्य शासनाने पुढील निधीची कोणतीही तजवीज किंवा नियोजन न केल्याने आर्थिक संकट वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला एलबीटीच्या अभय योजनेपोटी ७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. अद्याप हा निधी प्राप्त झालेला नाही. हा निधी प्राप्त होण्यासाठी अजून किमान दहा दिवस लागतील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यानंतरच्या अनुदानाचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. कारण आता एलबीटीसुद्धा बंद झाल्याने शासकीय अनुदानावरच महापालिकेला अवलंबून राहावे लागणार आहे. शासनाच्या अनुदानाचे ठोस नियोजन अद्याप झालेले नाही. अनुदान महिन्याला मिळणार की कधी?, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला अनुदान प्राप्त होणे आवश्यक असल्याचे महापालिकेतील काही जाणकार नगरसेवकांचे मत आहे. कारण वेळेत अनुदान आले नाही, तर वेळेत प्रत्येक गोष्टीची बिले व खर्च भागविणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या व पर्यायाने नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. अनुदानभरोसे बसलेल्या महापालिकेला आता भविष्याची चिंता सतावू लागली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रोत्साहन अनुदानावेळीही अशीच स्थिती झाली होती. थकित ११ कोटी रुपयांसाठी महापालिकेला वारंवार शासनाचे उंबरठे झिजवावे लागले होते. आता पुन्हा अनुदानासाठी अशीच कसरत महाालिकेला करावी लागते की काय?, अशी शंका उपस्थित होत आहे. महापालिकेच्या आस्थापनाचा खर्च अधिक आहे. महिन्याकाठी किमान १0 कोटी रुपये यासाठी खर्च होतात. यामध्ये वीज, पाणी, दूरध्वनी बिले, पेन्शन, पगार, मानधन अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. निव्वळ आस्थापना खर्च करतानाच महापालिकेची कसरत होत आहे. मग प्रत्यक्ष विकास कामांची काय परिस्थिती होणार, याची चिंता आता सतावत आहे. महापालिकेच्या विकास कामांची अवस्था यापुढे आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. प्रतिमाह १0 कोटी १८ लाख रुपयांचा खर्च अनिवार्य असताना, महापालिकेच्या तिजोरीत ६ ते ७ कोटी रुपये जमा होत आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला महापालिकेस सुमारे ४ कोटीची तूट दिसून येत आहे. त्यामुळेच पैशाची ही सर्कस नंतर खूप अवघड वळणावर जाण्याची शक्यता आहे. बेभरवशाच्या अनुदानावर पालिकेच्या खर्चाचे गणित घालावे लागणार आहे. हे गणित नंतर महापालिकेला मोठ्या आर्थिक संकटात टाकणार, हे निश्चित. विकासकामेही ठप्प होऊ शकतात. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांबरोबरच नगरसेवकांचीही चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी) एलबीटीच्या उत्पन्नाचा फुगा फुटणार एलबीटीच्या माध्यमातून आणखी १२५ कोटी रुपये मिळतील, अशी आशा बाळगणाऱ्या महापालिकेच्या पदरात दहा कोटींवर रक्कम पडेल, असे वाटत नाही. सध्याच्या वसुलीचे आकडे पाहिले, तर १५ आॅगस्टपूर्वी आठ ते दहा कोटी रुपयेच जमा होतील, अशी चिन्हे दिसत आहेत. जमा-खर्चाचा महापालिकेचा तराजू खर्चाच्या बाजूूला अधिक झुकलेला असेल. कोलमडणारे अंदाजपत्रक सावरायचे असेल तर, किमान ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न नव्या स्रोतांमधून मिळवावे लागेल. उपलब्ध स्रोतांवर भरवसा ठेवून चालणार नाही. बजेटचा प्रवास धोकादायक वळणावर पोहोचला आहे. चालू बजेटच्या कालावधीतील चार महिने निघून गेले आहेत. उर्वरित आठ महिन्यांच्या कालावधित उत्पन्नाच्या बाजूस मोठा कायापालट होईल, याची कोणतीही शक्यता दिसत नाही.