शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सोनसळकरांचा हातच ‘लय भारी’

By admin | Updated: August 17, 2015 00:13 IST

कवठेमहांकाळात राजकारण तापले: राष्ट्रवादीचे संस्थान खालसाची वेळ-कवठेमहांकाळचे कुरुक्षेत्र -३

अर्जुन कर्पे-  कवठेमहांकाळ  सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत ‘महांकालीच्या कुरुक्षेत्रावर’ वाळव्याच्या वाघाच्या डरकाळीपेक्षा सोनसळच्या साहेबांचा ‘हातच लय भारी’ ठरला असून, त्या दुष्काळी पट्ट्यात राष्ट्रवादीचे संस्थान काबीज करण्यासाठी सोनसळच्या साहेबांनी जोरदार खालसा धोरण राबवण्याचा धडाका सुरू केला. मात्र खालसा धोरणामुळे याचा फटका राष्ट्रवादी व कॉँगेसच्या गटालाही बसला. असे असले तरी या निवडणुकीच्या माध्यमातून सोनसळच्या डॉ. पतंगराव कदम साहेबांचा जिल्ह्यातील साम्राज्य विस्तार वाढू लागला आहे, हे स्पष्ट झाले आहे. तर वाळव्याच्या वाघाचा कायमच वेगात असणारा अश्वरथ मात्र ऐन लढाईवेळी दुष्काळी कुरुक्षेत्रावर गटवारी, नाराजी अन् जिरवाजिरवीच्या राजकीय गाळात रुतला.बाजार समितीच्या निवडणुकीत भविष्यातील राजकारणाची अनेक बीजे पेरली गेली आणि ही बीजे पुढील राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार आहेत, हे निश्चित.या निवडणुकीच्या माध्यमातून कवठेमहांकाळ, जत, मिरज या दुष्काळी टापूत साम्राज्य विस्ताराचे धोरण राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय नेते जयंत पाटील, तर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी राबवले. यामध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या राजकीय समीकरणाला यश आल्याने साहजीकच या दुष्काळी टापूत सोनसळच्या साहेबांचा राजकीय वारू सुसाट धावू लागला आहे.‘आबा’ हे माझे लहान बंधू आहेत, असे सांगत सोनसळच्या साहेबांनी थेट दुष्काळी टापूत ‘हात’ घतला. त्यामुळे या निवडणुकीत आबांनी सांभाळलेले काही मोहरे सोनसळच्या साहेबांच्या ‘हाताला’ लागले आहेत. यातील काही मोहऱ्यांनी या निवडणुकीत ‘राजकीय हात धुऊन’ही घेतले, तर काही नाराज मोहरेही साहेबांच्या या निवडणुकीच्या माध्यमातून संपर्कात आहेत. मुळात सोनसळच्या साहेबांनी एका निशाणात अनेक राजकीय उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत. त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादीला तर हादरा दिलाच, परंतु खोलवर राजकीय विचार करता गटा-तटाच्या राजकारणातही ते सर्वांनाच भारी पडले आहेत. कॉँग्रेसमध्येसुद्धा गटा-तटाच्या राजकारणाचा विचार करता, तालुक्यात सोनसळकरांचा राजकीय दबदबा वाढण्यास सुरुवात झाली आहे. वसंतदादा गट बॅकफुटवर!या निवडणुकीत प्रतीक पाटील व विशाल पाटील तालुक्यात कुठेच लोकांच्या चर्चेत दिसले नाहीत. त्यामुळे भविष्यातील जिल्ह्याच्या गटा-तटाच्या राजकारणात कवठेमहांकाळ तालुक्यात ‘दादा गटाला’ बॅकफुटवर यावे लागणार, हे स्पष्ट झाले आहे. कवठेमहांकाळ, जत, मिरज या तालुक्यात जयंतराव पाटील यांना मात्र ही निवडणूक ‘दगा’ देणारी ठरली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजपर्यंत सात अश्वांचा धावणारा जयंत पाटील यांचा राजकीय रथ या निवडणुकीत पतंगरावांनी रोखला. एकूणच या निवडणुकीत वाळव्याच्या वाघाच्या डरकाळीला ‘सोनसळच्या साहेबांचा हातच’ लय भारी ठरला आहे.